भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण

 भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण

नेवासा येथे कार्यरत असलेले शेवाळे यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बांधकाम उपविभाग नेवासा कार्यालयात कार्यरत असलेले लिपीक. हेमंत शेवाळे हे गेल्या अठरा ते वीस वर्षापासून राहुरी ते नेवासा ह्या एकच कार्यालयात काम करीत असून ते अति मुजोर  असून त्यांची  शासकीय नियमानुसार बदली व्हावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालय अहमदनगर येथे उपोषण करताना बाळासाहेब बागुल, हानिप पठाण, राजेंद्र त्रिभुवन, अहमद शेख, किशोर गाडे, साहेबराव काते, सुनील सकट आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून या पदावर कार्यरत असून या कार्यालयात कामे घेऊन येणार्‍या नागरिकांशी उघडपणे वावरणे अरेरावीची भाषा करत असल्याने आम्ही वेळो वेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच बांधकाम मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक आदी वरिष्ठांना तक्रारी अर्ज देऊन लिपिक हेमंत शेवाळे लिपिकाची त्वरित शासकीय नियमानुसार जिल्ह्याबाहेर बदली व्हावी या साठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील वरिष्ठांनी तक्रारीची कुठल्याही दखल न घेतल्या बद्दल भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर या कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment