खा. विखे, कर्डिलेंनी कामगारांना वारंवार आश्वासन देणं बंद करावं. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 30, 2021

खा. विखे, कर्डिलेंनी कामगारांना वारंवार आश्वासन देणं बंद करावं.

 खा. विखे, कर्डिलेंनी कामगारांना वारंवार आश्वासन देणं बंद करावं.

तनपुरे सहकारी कारखाना कामगारांचे उपोषण..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तनपुरे सहकारी कारखाना सुरू करण्यामध्ये या कामगारांचे पहील्यापासुन मोठे योगदान आहे. कारखाना संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी सुजय विखे व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी आता कामगारांना वारंवार आश्वासन देणे बंद कराव.एक तर दिलेल आश्वासन न पाळण ही बाब गंभीर असुन फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे.कामारानां वारंवार आश्वासन देऊन त्यांना क्रुपया कात्रजचा घाट दाखवु नये. व त्यांच्या भावनांशी खेळु नये. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.सुरेश लगड यांनी केले आहे.
थकीत पगार, प्रोव्हीडंड फंड, ग्रॅच्युइटी या मागण्यांसाठी डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कामगारांनी कार्यस्थळी उपोषण सुरु केले आहे.खर तर या कामगारांना त्यांचे थकीत वेतनासाठी उपोषणास बसावे लागते ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून लगड पुढे म्हणाले की, मोठ्या विश्वासाने सभासद बंधुभगीनींनी कारखाना आपल्या ताब्यात दिला त्याचा गांभीर्याने विचार करावा.कामगारांना न्याय देणेचा प्रयत्न करावा ज्या लोकप्रतिनिधींच्या अधिपत्याखाली हा कारखाना चालू आहे त्यांनी स्वतः व संचालक मंडळाने कामगारांना लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेऊ नये  विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधींच्या अधिपत्याखालील विखे कारखान्याचे व गणेश कारखान्याचे कामगारांचे वेतनही थकीत असल्याने ते या कामगारांना कधी वेतन देतील हा प्रश्नच आहे.तेंव्हा कामगारांना वारंवार चर्चेत न गुंतवता कामगारांचा हा प्रश्न पोटतिडकीने आहे  मार्गी लावावा अशी विनंती सामाजिक भावनेतून करत आहे असे अ‍ॅड.सुरेश लगड यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment