राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅली व रोग प्रतिकारक शक्ती जागरूकता कार्यक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 30, 2021

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅली व रोग प्रतिकारक शक्ती जागरूकता कार्यक्रम

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅली व रोग प्रतिकारक शक्ती जागरूकता कार्यक्रम

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा उपक्रम...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव तसेच राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रमांतर्गत सायकल रॅली व रोग प्रतिकारक शक्ती जागरूकता कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.      
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व एनसीसी प्रमुख प्रा. रत्नाकर झिटे, एन एस एस प्रमुख प्रा. रमेश थोरात आणि क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ यांनी सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
श्रीगोंदा ते काष्टी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के साहेब, प्राध्यापक एल आर पाटील सर, साळवे सर, भुजबळ सर, थोरात सर, झिटे सर, शेटे सर, टकले सर, डफळ सर, दरेकर सर, ढगे सर, कुंभार सर, अर्जुन सर व एनसीसी कॅडेट, खेळाडू, एनएसएस स्वयंसेवकानी सहभाग नोंदविला व सायकल रॅली यशस्वी पार केली. महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सायकल रॅली साठी हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

No comments:

Post a Comment