राधाकृष्ण विखे व हर्षवर्धन पाटील यांनी आज घेतली अमित शहांची भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 11, 2021

राधाकृष्ण विखे व हर्षवर्धन पाटील यांनी आज घेतली अमित शहांची भेट.

 राधाकृष्ण विखे व हर्षवर्धन पाटील यांनी आज घेतली अमित शहांची भेट.

राजकीय पुनर्वसनासाठी गुफ्तगू!


नवी दिल्ली ः
केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी, त्यांनी शहा यांच्याशी सहकार तसेच इतर विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली. तसेच, या दोन्ही नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचा सत्कार केला. महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या या थेट भेटीने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.
या भेटीत राजकीय पुनर्वसन करण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी शहा यांच्याशी चर्चा केली असण्याची शक्यता सांगितली जात आहे.कारण दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाला आता दोन-अडीच वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही भाजपत त्यांना, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं असं कोणतंही पद किंवा जबाबदारी दिली गेली नाहीये, ही बाब लक्षात घेतली तर, या पार्श्वभूमीवर देखील या दिग्गज नेत्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या काळात, राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते मानले जात होते. त्यामुळे या दोघांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल अशी चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सलग 7 वर्षांपेक्षाही अधिक काळ सहकार मंत्री होते. दोन्ही नेत्यांचा राज्यातील राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. तसेच, दोघेही राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक आहेत.

No comments:

Post a Comment