300 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

300 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश.

 300 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश.

पोलिस अधीक्षकांनी काढले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. शनिवारी (दि.31) सायंकाळी उशिरा 344 विनंती अर्जांसह 174 प्रशासकीय बदल्यांबाबतचे निर्णय घेऊन, त्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत. दरम्यान, यामध्ये 187 विनंती बदल्यांचे अर्ज मंजूर झाले असून, 113 जणांच्या प्रशासकीय बदल्या अशा एकूण तीनशे कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. अधीक्षक पाटील यांनी कर्मचार्यांशी संवाद साधून विनंती बदल्यांबाबत विचारणा केली. त्यानंतर अर्जांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.
शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशांमध्ये 344 विनंती अर्जांवर निर्णय घेण्यात आला आहे. यात 157 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर 187 कर्मचार्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय बदल्यांमध्ये 174 आदेश काढण्यात आले आहेत. यातील 39 जणांना आहे त्याच ठिकाणी 1 वर्षासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर एलसीबी व सीसीटीएनसच्या 20 कर्मचार्यांचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत. 113 कर्मचार्यांच्या इतरत्र बदल्यांचे आदेशही बजावण्यात आले आहेत. दरम्यान, बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस शिपाईपासून ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment