पारनेर तहसिलदारांनी खंडणीचा, खोटा गुन्हा दाखल केला- अरुण रोडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

पारनेर तहसिलदारांनी खंडणीचा, खोटा गुन्हा दाखल केला- अरुण रोडे

 पारनेर तहसिलदारांनी खंडणीचा, खोटा गुन्हा दाखल केला- अरुण रोडे

प्रशासनाचे वाळूमाफियांशी अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पारनेर तालुक्यात विविध नदीपात्रांमध्ये पोकलेनसह इतर यंत्रांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून, या वाळू उपशाचा तमाशा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या पाठबळा वर सुरू आहे. मी हा व्यवसाय तातडीने बंद करावा. अशी सतत मागणी केल्याने तहसीलदार व पोलीस निरीक्षकानीं एकत्र येत संगणमताने कट करत माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. वाळू उपशाला अधिकार्याचीं फूस असून मी या विरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे सर्वानी एकत्र येत मला खोट्या गुन्हात अडकवले आहे. असा आरोप पारनेर तहसिलदारांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात केला असून पारनेर तहसीलदार, पोलीस निरीक्षक व वाळू माफियांच्या अर्थपुर्ण संबंधामुळे राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे. 3 वर्षात तालुक्यात बेकायदा वाळू उपशातून लाखो रुपये रॉयल्टी बुडवली आहे. बुडवली जाणारी रॉयल्टी (स्वामित्व धन) तहसीलदार यांच्याकडून वसुलपत्र होण्यासाठी आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करत कोर्टात दाद मागण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
अवैध वाळू उपशाला विरोध केल्याने पारनेर तहसीलदारांकडून खंडनीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप रोडे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन खोटा गुन्हा मागे घेऊन तहसीलदार, पारनेर पोलीस व वाळू माफिया यांचे आर्थिक हितसंबंधाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या पूर्वी ही तहसीलदार यांनी तालुक्यातील अनेक नागरिकांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्यातून त्यांच्यावर कारवाई करण्याची तालुक्यातून मागणी झाली होती. तालुक्यातील अधिकार्यांचे काळे हात वाळूमध्ये गुंतले असून, हेच वाळू माफिया वाळू रक्तरंजित बनवत आहेत व यांस सर्वस्वी तहसीलदार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
अवैध वाळू उपशाला महसूल विभागाचे कर्मचारी पाठबळ देत असून, वाळुमाफियांची नेहमीच पाठराखण करत असल्याचे सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत. अशा भ्रष्ट अधिकार्यांवरती वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत? असे प्रश्न  जनता नेहमीच विचारत आहे. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला तर आमच्यावर खंडनीचा गुन्हा दाखल केला  जाऊन आमचा आवाज दाबला जातो ही शोकांतिका असल्याचे निवेदनात रोडे यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment