अनाथ मुलांना राष्ट्रवादीचा आधार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 21, 2021

अनाथ मुलांना राष्ट्रवादीचा आधार.

 अनाथ मुलांना राष्ट्रवादीचा आधार.

कोरोना काळातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना.
अजित पवारांच्या वाढदिवसासाठी राष्ट्रवादीकडून खास भेट,


मुंबई ।
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या(22 जुलै) वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या पक्षाने वाढदिवसासाठी अनोखी भेट दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून ही घोषणा केली आहे. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून ‘राष्ट्रवादी जिवलग’ ही योजना सुरु करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांची ही खास भेट ठरली आहे. करोना काळात अनाथ झालेल्या राज्यातील 450 मुलांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेतून अनाथ मुलांना प्रेमाचा आधार दिला जाणार आहे. योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील 450 सहकारी प्रत्येकी एका कुटुंबातील मुलांशी जोडले जाणार आहेत. अनाथ मुलींची जबाबदारी पक्षातील महिला, युवती तर मुलांची जबाबदारी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता घेणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. अनाथ मुलांसाठीची योजना राबवण्यासाठी पक्षानं ‘राष्ट्रवादी दूत’ तयार केले आहेत. हे दूत 450 अनाथ मुलांच्या घरात जातील. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाला देतील. शिवाय, प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांकडं उपलब्ध असलेली या अनाथ मुलांची माहिती जमा केली जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम हाती घेतला जाईल. संपूर्ण उपक्रमाची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाइटवर व माझ्या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल, असंही सुळे यांनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून माहिती दिली असून त्या ाहरपरश्रूर, ‘अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी भरून काढण्याचं ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून करण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. या योजनेत सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment