भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने आंबेकर कुटुंबाला आर्थिक मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने आंबेकर कुटुंबाला आर्थिक मदत

 भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने आंबेकर कुटुंबाला आर्थिक मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील भोयरे पठार गावातील भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच भोयरे पठार गावातील आंबेकर कुटुंबावर संकट कोसळा आहे कारभारी आंबेकर यांचा अपघाती निधन झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांच्या दोन मुलींच्या नावे बँक खात्यामध्ये 40 हजार रुपयाचे एफ डी करून धनादेश देण्यात आला            
घरामध्ये करता माणूस गेला तर संसाराचा गाडा पूर्णपणे थांबून जातो या भावनेने भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला व भविष्यात दोन्ही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी व अन्य खर्चासाठी उपयोगी पडणार असल्याची भावना संघटनेचे संजय मुठे यांनी व्यक्त केली यावेळी अध्यक्ष संजय मुठे, देवराम कोल्हे, नाना वाटोळे, प्रकाश मुठे, विजय उरमुडे, विक्रम अंबेकर, अशोक मुठे,दादाभाऊ बोरकर, बाळू आंबेकर, विकास आंबेकर, राजू झरेकर आदी सह भोयरे पठार गावातील भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment