भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती

 भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी आंबेडकर यांना नियुक्तीपत्र दिले.
रघुनाथ आंबेडकर गेली अनेक वर्ष सामाजिक चळवळीत कार्यरत आहे. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधात ते सक्रीय आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. आंबेडकर संघटनेच्या माध्यमातून दुर्बल घटकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील राहणार आहेत. मान्यता प्राप्त या संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात कार्य सुरु असल्याचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी सांगितले.    
नूतन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी भ्रष्टाचारने देश पोखरला असून, समाजाला लागलेली ही किड दूर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य सुरु असून, भ्रष्टाचाराला अळा घालण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल त्यांचे संघटनेचे पारनेर तालुकाध्यक्ष सचिनदादा ठुबे, जिल्हा संघटक भानुदासजी साळवे, नगर शहराध्यक्ष संदीप हजारे, नगर तालुकाध्यक्ष युवराज हजारे, प्रकाश थोरात, डॉ. अभिजीत रोहोकले, अन्याय निवारण सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुणराव रोडे, हरेश्वर साळवे, प्रा.सुनिल धस आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment