सहा लाखांचे बनावट, वाटाणा बियाणे जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

सहा लाखांचे बनावट, वाटाणा बियाणे जप्त.

 सहा लाखांचे बनावट, वाटाणा बियाणे जप्त.

कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
बनावट वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रक मध्ये  प्रती बग 40 किलो, एकूण बॅग संख्या 150 असा एकुण 6 लाख-रुपयाचा बनावट वटाणा बियाणे हस्तगत केले असून  जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारनेर ठाण्यामध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
किरण गुलाबराव गवय 45 वर्षे धंदा-नोकरी म. रा. श्रीगोंदा जिल्हा नगर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बनावट बियाणे संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने काल वटाण्याचं बियाणे आले असून त्यामध्ये बनावट बियाणे असल्याचे माहिती पथकाला कळल्यानंतर या ठिकाणी सापळा रचून संबंधित चालकाची अधिक माहिती पोलिसांनी घेतली तो ट्रक घेउन ट्रक क्रमांक णझ- 92 ढ 8149 आंबेडकर चौक पारनेर येथे उभा होता,त्यात एकूण 6 टन वजनाचे बनावट वटाणा बियाणे आहे. ट्रकमधे पटेल सिडस कार्पोरेशन जालौन युपी या कंपनीचे 6 टन व्हरायटी एपी 3 लट क्रमांक 21-24-510-16-2 प्रमाणित प्रमाणपत्र क्रमांक 30148 तपासणी दिनांक 02/05/2021 टग क्रमांक 102175840556 बगचे यजन प्रती बग 40 किलो एकूण बग संख्या 150 असा एकुण 6,00,000/-रुपयाचा बनावट वटाणा बियाणे मिळुन आले आहे.ट्रक क्रमांक णझ 92 ढ 8149 ही वरील चालक (नाव पत्ता माहीत नाही), पटेल सिडस कार्पोरेशन जालीन युपी या कंपनीचा मालक नाव पत्ता माहीत नाही. याचेविरुद्ध भा.द.वि कलम 420 सह बियाणे नियंत्रण आदेश 1983 खंड 3 (1) जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 मधील कलम 3(2) व बियाणे अधिनीयम 1966 चे कलम 19,21 अन्वये नुसार पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळीबा नाथु उपडे कृषी अधिकारी पंचायत समिती पारनेर ता पारनेर , विलास रावजी गायकवाड तालुका कृषी अधिकारी पारनेर , जयंत किसनराव साळवे तालुका कृषी अधिकारी पंचायत (समिती पारनेर 4) ,किरण गणपत पिसाळ नेमणुक मंडळ कृषी अधिकारी पारनेर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment