निमगाव वाघा ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

निमगाव वाघा ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

 निमगाव वाघा ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा


अहमदनगर ः
अहमदनगर- निमगाव वाघा (ता. नगर) गावातील ग्रामपंचायत मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. सरपंच रुपाली जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयावर शिवस्वराज्य ध्वज फडकवून त्यचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, किरण जाधव, उद्योजक दिलावर शेख, गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, डॉ. विजय जाधव, अतुल फलके, पिंटू जाधव, अरुण अंधारे, शंकर गायकवाड, नवनाथ फलके, अरुण पुंड आदी उपस्थित होते.
शासनाच्या आदेशाप्रमाणे साधेपणाने व उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास गावातील शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला. पै. नाना डोंगरे म्हणाले की, देश मोठ्या संकटातून जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य जगण्यास बळ देतात. देशाला खर्या अर्थाने रयतेच्या राजेंची गरज आहे. शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य घटक केंद्रबिंदू माणून आदर्श राज्य निर्माण केले. त्यांची रणनिती व राज्यनिती सर्वांना आदर्श असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ग्रामसेवक गोवर्धन राठोड यांनी ग्रामस्थांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment