साईसिद्धी' ट्रस्टकडून प्रवरा कोविड सेंटरला ५१ हजारची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 3, 2021

साईसिद्धी' ट्रस्टकडून प्रवरा कोविड सेंटरला ५१ हजारची मदत

 साईसिद्धी' ट्रस्टकडून प्रवरा कोविड सेंटरला ५१ हजारची मदतनगरी दवंडी

शिर्डी - शिर्डी येथील साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोणी येथील प्रवरा कोविड सेंटरला ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. लोणी येथे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड सेंटरसाठी शिर्डी येथील साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्व. वत्सलाबाई गोविंदराव कोते यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपये देणगीचा धनादेश माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष व साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक कैलासबापू कोते, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here