व्यापारी पतसंस्थेकडून श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास 31 हजाराची देणगी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

व्यापारी पतसंस्थेकडून श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास 31 हजाराची देणगी

 व्यापारी पतसंस्थेकडून श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास 31 हजाराची देणगी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील बेलवंडी व्यापारी बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेलवंडी बु.विद्यालयाच्या इमारत रंगकामासाठी 31 हजाराची देणगी प्राचार्य संपतराव पवार यांच्याकडे चेअरमन सोपानराव हिरवे , व्हा. चेअरमन युवराज पवार,उपसरपंच उत्तमभाऊ डाके यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली. यावेळी याप्रसंगी संस्थेचे मॅनेजर किसनराव वर्‍हाडे, स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य तात्यासाहेब हिरवे , जयदीप मगर, संजय जठार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
                   श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेलवंडी बु.विद्यालयाच्या लोकसहभागातुन तयार केलेल्या भव्य इमारतीचे बांधकाम अतिशय कठीण परिस्थितीत पूर्णत्वास नेले मात्र या इमारतीचे रंगकाम पूर्ण होण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने मदतीचे आवाहन केल्या नंतर बेलवंडी व्यापारी बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेलवंडी बु.विद्यालयाच्या इमारत रंगकामासाठी 31 हजाराची देणगी प्राचार्य संपतराव पवार यांच्याकडे चेअरमन सोपानराव हिरवे , व्हा. चेअरमन युवराज पवार,उपसरपंच उत्तमभाऊ डाके यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here