कॉल लोकेशन तपासून मुख्यालयात उपस्थित न राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा ः रावडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

कॉल लोकेशन तपासून मुख्यालयात उपस्थित न राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा ः रावडे

 कॉल लोकेशन तपासून मुख्यालयात उपस्थित न राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा ः रावडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या संकटात नेमणुक असलेल्या मुख्यालयी उपस्थित न राहणार्‍या नगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कॉल लोकेशन तपासून यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी केली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास दि.15 जून जिवंतपणीच शरीर दान करणार आहे. तर दोन्ही किडन्या आणि इतर अवयव काढून त्यापासून मिळणारे पैसे शासनाने कोरोनाच्या मदत निधीसाठी जमा करून घेण्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात रावडे यांनी निवेदन मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना ई मेलद्वारे पाठविले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या नियुक्त ठिकाणी मुख्यालयी उपस्थित राहण्याचे लेखी आदेश दि.3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तरी नगर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने मुख्यालयी उपस्थित राहत नाही त्यामुळे शासनाचे आणि सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. मुख्यालयी न राहता इतर ठिकाणाहून कामाच्या ठिकाणी ये-जा करत असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्यापासून कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी हे खरोखर मुख्यालय राहतात की नाही? याची खात्री करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स नुसार लोकेशनची तपासणी करून या तपासणीमध्ये दोषी आढळणार्‍यावर कारवाई करावी, तसेच या अधिकार्‍यांना पाठिशी घालून सदर प्रकारणाची माहिती शासनापासून लपवून ठेवणारे दोषी सरपंच व इतर अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरची तक्रार केल्यामुळे मुख्यालयी न राहणार्‍या अधिकार्‍यांपासून आणि त्यांना मदत करणारे सरपंच यांच्यापासून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे नमुद केले आहे. सदर प्रश्नी कार्यवाही न  झाल्यास दि. 15 जूनला शासनाला जिवंतपणीच शरीर दान करणार आहे. त्यावेळी दोन्ही किडन्या आणि इतर किमती अवयवांचे दान घेऊन त्यापासून मिळणारे पैशाची रक्कम शासनाने मदतनिधीस म्हणून जमा करून घ्यावे असे रावडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment