खा.राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने संकल्प दिन कार्यक्रमाचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

खा.राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने संकल्प दिन कार्यक्रमाचे आयोजन

 खा.राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने संकल्प दिन कार्यक्रमाचे आयोजन

काँग्रेस करणार कोरोना योद्ध्यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालयामध्ये संकल्प दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी नगर शहरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी दिली आहे.
विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रभर राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरात देखील काँग्रेसच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
देशामध्ये कोरोना स्थिती असल्यामुळे राहुल गांधींचा वाढदिवस थाटामाटात साजरा न करता कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये काम केलेल्या योद्ध्यांच्या सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. यामध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून नगर शहरामध्ये कोरोना काळामध्ये ज्यांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून लोकांना मदत केली अशांचा सन्मान करून प्रोत्साहित करण्याचे काम केले जाणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. सायंकाळी सहा वाजता कालिका प्राईड येथे संकल्प दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

No comments:

Post a Comment