अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला केला सुपूर्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 15, 2021

अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला केला सुपूर्त

अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला केला सुपूर्त 



नगरी दवंडी

जामखेड - रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करून नमाज पठन करतात . रमजान ईदचे औचीत्य साधुन जामखेड तालुक्यातील जवळा गावातील अंगणवाडी सेविका सौ . मीनाताई मुसा शेख यांनी चक्क एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला सुपूर्त केला .

    महाराष्ट्र तसेच जगावर कोरोणा या विषाणूच्या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस खूप मोठे कोरोणा पेशंट वाढत असून त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोरोणा विषाणूचा संसर्ग होत आहे. या काळामध्ये डॉक्टर रविदादा आरोळे यांनी जामखेड येथे मोफत सुविधा कोरोणा संसर्ग झालेल्या व्यक्तिंना देत आहेत. रमजान ईदचे औचित्य साधुन पवित्र अशा रमजान महित्यात सौ . मीनाताई शेख यांनी एक महिन्याचा पगार डॉक्टर आरोळे यांना तो सुपूर्त करण्यात आला. त्याप्रसंगी डॉक्टर रविदादा आरोळे,जामखेड पंचायत समितीचे सभापती मा. सुर्यकांत (नाना) मोरे ; माजी सभापती भगवान मुरुमकर ; माजी सभापती सुभाष आव्हाड ; गटविकास धिकारी कोकणे साहेब ; जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे ; सामाजिक कार्यकर्ते अशोक धेंडे ; देवदैठन सरपंच दादासाहेब भोरे ; नय्युम शेख; समीर शेख ; जिवन रेडे उपस्थित होते .                                                         यावेळी सभापती सुर्यकांत मोरे यांनी मीनाताई शेख यांनी पवित्र रमजान महिन्यात पवित्र असे दान केले . त्यांच्या कार्याला सलाम करतो त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांची प्रेरणा इतरांनी घेणे काळाची गरज आहे तसेच येणाऱ्या काळात कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांचा आदर्श घेत पावलावर पाऊल ठेवत खांद्याला खांदा लावून  समाज सेवा करत राहणार व डॉक्टर रवि दादाआरोळे हॉस्पिटलला सर्व दानशूरांनी मदत करावी असे आवाहन मोरे यांनी केले.

प्रतिनिधी नासीर पठाण सह अशोक वीर जामखेड .

No comments:

Post a Comment