बालिकाश्रम रोड परिसरात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

बालिकाश्रम रोड परिसरात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

 बालिकाश्रम रोड परिसरात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
नगर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड लसीकरण सुरु असून सर्वच केंद्रांवर लसीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेने बोल्हेगाव, केडगाव ,व इतर ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र आणि उपकेंद्र सुरु केले आहे. याच अनुशंगाने बालिकाश्रम रोड परिसरातहीदेखील स्वतंत्र लसीकरण केंद्र अथवा उपकेंद्र सुरु करण्याची गरज आहे
बालिकाश्रम रोड परिसर मोठ्या लोकवस्तीचा भाग आहे. वाघमळा, बडोदा कॉलोनी, कवडेनगर, जाधवमळा, सुडकेमळा , चिंतामणी हॉस्पिटल परिसर, लेंडकरमळा,सिद्धार्थ नगर या भागात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिक सातत्याने स्वतंत्र लसीकरण केंद्रासाठी आग्रही आहेत. या परिसरातील नागरिकांना सध्या लसीकरणासाठी लांब अंतरावर जावे लागते. लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू आहे, अशा परिस्थितीत दूर अंतरावर जाणे जिकीरीचे होते. याशिवाय वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिकांनाही दूर अंतरावरील लसीकरण केंद्रावर नेताना अडचणी येतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी बालिकाश्रम रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी मातोश्री प्रतिष्ठान च्या वतीने करीत आहोत
मनपाने शहरातील इतर भागात ज्या पध्दतीने लसीकरण केंद्र व उपकेंद्र सुरु केले त्याचपध्दतीने बालिकाश्रम रोड परिसरातही  लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment