मनपा हद्दीत उदया दिला जाणार केवळ कोव्‍हॅकसीनचा दुसरा डोस – सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

मनपा हद्दीत उदया दिला जाणार केवळ कोव्‍हॅकसीनचा दुसरा डोस – सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर

 मनपा हद्दीत उदया दिला जाणार केवळ कोव्‍हॅकसीनचा दुसरा डोस – सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर नगरी दवंडी

नगर -  45 वर्षा पुढील नागरिकांनी कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सरकारच्‍या वतीने कोव्‍हॅकसिनचा डोस दिला होता.  काही दिवसापासून दुसरा डोस मिळत नसल्‍यामुळे ज्‍येष्‍ठ नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले होते. या विषया संदर्भात मनपाचे सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांनी तातडीने जिल्‍हापरिषदचे मुख्‍यकार्यकारी अधिकारी मा.श्री.राजेंद्र क्षिरसागर व मनपा आयुक्‍त मा.श्री.शंकर गोरे  यांचेशी संपर्क साधून या विषयावर चर्चा केली होती. त्‍यानंतर लगेच मा.आयुक्‍त यांनी सांगितले कोव्‍हॅकसिनचा दुसरा डोस  उपलब्‍ध करून देण्‍याची व्‍यवस्‍था लवकरात लवकर केली जाईल. सभागृह नेते मा.श्री.रविद्र बारस्‍कर यांच्‍या कोव्‍हॅकसिन लस उपलब्‍धतेसाठी केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश आले असून मनपाकडे कोव्‍हॅकसिनची लस उपलब्‍ध झाली आहे.

सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांनी सांगितले की, नगर शहरातील ज्‍येष्‍ठ नागरिक  दुसरा डोस घेण्‍यासाठी लसीकरण केंद्रावर भल्‍या पहाटे रांगा करून उभे राहत होते. मात्र कोव्‍हॅकसिनची लस उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे ज्‍येष्‍ठ नागरिकांना मनस्‍ताप होत होता. तसेच एका केंद्रा वरून दुस-या केंद्रावर लस मिळेल या आशेन जात होते. मात्र लस उपलब्‍ध होत नव्‍हती. यासाठी ग्रामीण भागात ही मिळेल यासाठी जात होते. मात्र ग्रामीण भागातील नागरिक शहरातील नागरिकांना कोव्‍हॅकसिनची लस देण्‍यास विरोध करित होते. त्‍यामुळे शहरातील नागरिकांमध्‍ये मोठया प्रमाणात मानसिक त्रास झाला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्‍यामुळे कोव्‍हॅकसिनची लस उपलब्‍ध झाली असून उदया फक्‍त कोव्‍हॅकसिन लस मनपाच्‍या सर्व लसीकरण केंद्रावर दिली जाणार आहे. तरी नागरिकांनी त्‍याचा लाभ घ्‍यावा असे आवाहन सभागृह नेता मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांनी केले.

 यावेळी सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर यांनी जिल्‍हा परिषदचे मुख्‍यकार्यकारी अधिकारी व मनपाचे आयुक्‍त यांचे कोव्‍हॅकसिनची लस उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल नगर शहराच्‍या वतीने आभार  मानत आहे.

No comments:

Post a Comment