जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायभान पाटील वाघ कालवश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 19, 2021

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायभान पाटील वाघ कालवश

 जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायभान पाटील वाघ कालवश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः उस्थळ दुमाला येथील गांधीवादी विचारसरणीचे जेष्ठ वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते रायभान गोविंद वाघपाटील यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 91 वर्षाचे होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
स्वर्. रायभान पाटील वाघ हे साधी राहणी आणि उत्तम विचारसणीचे निर्भिड आणि रोखठोक व्यक्तीमत्व होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक राजकारणात सलग पंचेचाळीसवर्ष ते कायम सत्तेत होते, समाजातील सर्व बहुजनांना ते कायम सोबत घेऊन समाजकारण करत. नेहमी न्यायाची भुमिका घेऊन गावातील वाद नेहमी गावतच मिटवत असत. अतिशय काबाडकष्ट करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करुन ते पुढे आले. ते प्रगतशिल शेतकरी होते. ते नेहमी सामाजिक, राजकिय, धार्मिक, संस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सहभाग घेत असत. त्यांचे सामाजिक, राजकिय भाषणे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. जनमानसात ते ’बापू’ व ‘नाना’ म्हणून परीचित होते. स्व. रायभान पाटील वाघ यांना नैसर्गिक मृत्यू जरी आला असला तरी सध्याच्या कोरोना महामारीच्या वातावरणात त्यांचा दशक्रियाविधी व तेरावा विधी तिसर्या व चौथ्या दिवशीच पार पाडून त्यांच्या कुटूंबियांनी एक आदर्श ठेवला आहे. स्व. वाघ हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक श्री.  ज्ञानेश्वर वाघ यांचे वडील तर माजी सरपंच दादासाहेब पाटील वाघ यांचे ते चुलते होत. त्यांच्या निधनाने उस्थळ दुमाला पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment