आमदार लंके यांचे संकट काळातील काम राज्याला दिशादर्शक ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

आमदार लंके यांचे संकट काळातील काम राज्याला दिशादर्शक !

 आमदार लंके यांचे संकट काळातील काम राज्याला दिशादर्शक !

पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक.


भाळवणी :
कोरोनाच्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी झोकून देऊन आमदार निलेश लंके करीत असलेले काम राज्याला दिशादर्शक असून त्यांच्या या कामामुळे रुग्णांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होत आहे. संकट काळात धावून जाण्याचे भाळवणी मॉडेल महाराष्ट्रात आदर्श ठरेल असे मत राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. आमदार लंके यांच्या संकल्पनेतून भाळवणी येथे उभारलेल्या अकराशे बेडच्या शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरला पद्मश्री पोपटराव पवार यांनी भेट देऊन येथील रुग्णांना मिळणार्‍या सोयी-सुविधा बद्दल समाधान व्यक्त करीत आमदार लंके यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले होते पुढारी जसे वागते गावोगावी तसेच लोक वागती घरोघरी म्हणून आहे पुढार्यांवर  जबाबदारी अशीच संकट काळातील जबाबदारी आमदार निलेश लंके यांनी घेतली आहे. दिवसभर सेंटरमध्ये थांबून ते रुग्णांची सेवा करीत आहेत.यामुळे रुग्णांना आधार तर मिळतच आहे मात्र, त्यांच्यात विश्वासाची भावना निर्माण होत असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले. यापूर्वीदेखील जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या साथीच्या रूपाने अनेक महामारी येऊन गेल्या परंतु या महामारी केवळ त्या देशापुरत्याच मर्यादित होत्या मात्र कोरोनाची महामारी हे जागतिक संकट असल्याचे सांगत या संकटाला सामना करण्याची जबाबदारी खासदार, आमदारांनी प्रमाणेच प्रत्येक लोकनियुक्त प्रतिनिधींची असल्याचे सांगत या काळात पैसा ही समस्या नाही तर समाजासाठी झोकून देणे, कार्यकर्त्यांची टिम उभी करणे ही खरी गरज आहे. यासाठी पक्ष, जातपात बाजूला ठेवून समाजासाठी आंतरिक भावना निर्माण होणे गरजेचे आहे.
प्रत्येक गावस्तरावर देखील कारण क्वारंटाईन सेंटरची सुविधा निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगत पद्मश्री पवार म्हणाले की,भाळवणी येथील कोव्हिड सेंटरचे अनुकरण राज्याने करणे गरजेचे आहे. येथे दाखल असलेल्या रुग्णांना कुटुंबा सारखीच भावना मिळत असल्याने त्यांच्यात विश्वास निर्माण होत आहे. त्यामुळेच ते लवकर बरे होत असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव ऍड. राहुल झावरे,राष्ट्रवादीचे सरचिटणीस बबलूशेठ रोहोकले, राजेंद्र चौधरी,बाळासाहेब खिलारी, संदीप चौधरी, दत्ता कोरडे, सत्यम निमसे,अविनाश जाधव, किसनराव सातपुते, सचिन ठाणगे, डॉ. योगेश पवार, प्रमोद गोडसे,आदी. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment