कोरोनात कर्तव्यावर असलेल्या 29 शिक्षकांचा जीव जाऊनदेखील शिक्षक लसीकरणापासून वंचित ः बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

कोरोनात कर्तव्यावर असलेल्या 29 शिक्षकांचा जीव जाऊनदेखील शिक्षक लसीकरणापासून वंचित ः बोडखे

 कोरोनात कर्तव्यावर असलेल्या 29 शिक्षकांचा जीव जाऊनदेखील शिक्षक लसीकरणापासून वंचित ः बोडखे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावत असलेल्या अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून, यामध्ये 29 शिक्षकांचा जीव गेला आहे. तरी देखील शिक्षक कोरोना काळात दिलेले काम प्रमाणिकपणे करीत असताना त्यांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संजय केळकर यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन पाठविले आहे. अन्यथा शिक्षक परिषद मंगळवार दि.18 मे रोजी आत्मक्लेष अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शिक्षक आमदार नागो गाणार यांनी देखील सदर प्रश्नी दखल घेण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शासन मान्यताप्राप्त संघटना आहे. संघटनेच्या वतीने वेळोवेळी शिक्षकांचे लसीकरण करुन घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या मागणीचे अद्यापि दखल घेण्यात आलेली नाही. शिक्षकांना कोरोना काळात वेगवेगळ्या प्रकारची प्रशासकीय कामे सातत्याने दिली जात आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळजवळ 29 शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेतील कोणताही विभाग लसीकरण शिवाय कामकाज करत नाही. शिक्षकांनी घरोघरी जाऊन कुटुंब सर्व्हे केला. त्यामधील टीम पैकी फक्त शिक्षक हा एकच घटक लसीकरणा शिवाय काम करत होता. कोरोना महामारीत कर्तव्य बजावणार्या शिक्षकांची गणना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून करावी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकांचे लसीकरण झालेले नसून, त्यांचे सरसकट लसीकरण करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र दिवसाचे लसीकरण सत्र आयोजित करण्याची मागणी आमदार केळकर व गाणार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनात कर्तव्यावर असलेल्या 29 शिक्षकांचा जीव जाऊन देखील शिक्षक लसीकरणापासून वंचित असून प्रशासनाने तातडीने शिक्षकांचे लसीकरण करुन घेण्याचे बाबासाहेब बोडखे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षकांचे लसीकरण न झाल्यास 18 मे च्या आंदोलनात नगर जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment