प्रभाग 11 मधील भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लावा अन्यथा मनपात आंदोलन ः कुरेशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

प्रभाग 11 मधील भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लावा अन्यथा मनपात आंदोलन ः कुरेशी

 प्रभाग 11 मधील भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लावा अन्यथा मनपात आंदोलन ः कुरेशी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अमृत योजने अंतर्गत भुयारी गटर योजनेचे काम माझ्या प्रभागात क्र. 11 मध्ये सुरू असून सर्व रस्त्यांचे खोदकाम झाल्यामुळे रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराच्या मुजूरपणामुळे रस्त्याचे पॅचिंगही केलें नाही याचबरोबर भुयारी गटर योजनेच्या खोदकामामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे नळ तुटले आहेत. ठेकेदाराने तुटलेले नळ कनेक्शन न जोडल्यामुळे नागरिकांना पाण्यावाचून वंचित रहावे लागत आहे. याचबरोबर ड्रेनेजचे कनेक्शनही जोडले गेले नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
    जो पर्यत सदरचे काम समाधानपूर्वक सुधारणा होत नाही तो पर्यत संबंधीत ठेकेदार याना सदर कामाचे देयके देण्यात येवू नयेत. प्रभागात सुरू असलेल्या कामाचे ठेकेदार यांचेसह पीएमसी अधिकारी, मनपा अधिकारी यांनी एकत्रित पाहणी करावी. सदर कामामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर बाबत योग्य ती कार्यवाही तातडीने व लवकरात लवकर करावी अन्यथा उपोषणा सारखा मार्ग अवलंबवावा लागेल याची नोंद घ्यावी. अशी मागणी मा.आयुक्त श्री.शंकर गोरे यांच्याकडे करताना नगरसेविका मा.श्रीमती कुरेशी परवीन आबीद मा.श्री.भा कुरेशी समवेत विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्कर, नगरसेवक मा.श्री.समद खान, नगरसेवक मा.श्री.सुलतान आसिफ शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here