अपघातस्थळी पोलिसास मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

अपघातस्थळी पोलिसास मारहाण.

 अपघातस्थळी पोलिसास मारहाण.

353 चा गुन्हा दाखल..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर-मनमाड रस्त्यावरील टेम्पो व फोर व्हीलरच्या अपघाताची माहिती घेण्यासाठी गेले असताना फोर व्हिलरचा चालक विष्णू काळे याने पोलिस व टेम्पो चालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
    श्री आप्पा बबन तरटे  वय 51 तोफखाना पोलीस स्टेशन यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, काल मला सकाळी 8.00 वाजता संभाजी बडे यांचेसह कर्तव्यावर नेमण्यात आले होते. मी कर्तव्यावर हजर राहून तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत मला नेमून दिलेल्या सेक्टर मध्ये बडे यांचेसह पेट्रोलिंग करत असताना 3.25 वाजता चे सुमारास पोलीस स्टेशन मधुन साळवे यांचा फोन आला की पोलीस कंट्रोल रूम येथून पोलीस स्टेशन येथे फोन आला असून सावेडी नाका नगर मनमाड रोडवर अपघात झालेला आहे. अपघाताचे ठिकाणी जाऊन परिस्थिती पाहून योग्य ती कारवाई करा. असे साहवे यांनी सांगितले नंतर मी व बडे आम्ही सावेडी नाका, नगर -मनमाड रोड अहमदनगर येथे 3:40 वाजताचे सुमारास गेलो असता टेम्पो चालक शेख रज्जाक चाँद यांना भेटलो. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, मी सावेडी नाका येथून माझा मालवाहू टेम्पो घेऊन नगरकडे जात असताना समोर उभी असलेली गाडी क्रमांक एम एच 16 सीव्ही 3033 हीने माझ्या गाडीला धडक दिली. व त्या गाडीसोबतचे लोक माझा टेम्पो कुठेतरी घेउन गेले आहेत असे टेम्पोचालकाने आम्हास सांगितले असता आम्ही कार चालक राहणार सावेडी गावठाण सावेडी यास तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशन येथे चला असे म्हणलो असता तो आम्हाला मी पोलीस स्टेशन येथे येणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा असे उद्धटपणाने म्हणाला. आणि थोड्या वेळात एक इसम त्याच्यासोबत दोन-तीन इसमांना घेऊन तेथे पोहोचला. ्या सर्वांनी मिळून आमच्या समक्ष हजर असलेला टेम्पो चालक  शेख रज्जाक चाँद याला व त्यांच्यासोबत असलेल्या इसमास शिवीगाळ करून मारहाण केली.आम्ही लगेच पोलीस स्टेशन येथे फोन करून पोलिसांची मदत मागितली. त्यावेळी विष्णू काळे याने आम्हा दोघांना शिवीगाळ करून त्याच्या हाताने जोरात दोन वेळा माझ्या डाव्या गालावर मारले. त्यात माझे डाव्या डोळ्याच्या भुवईला फटका लागुन माझ्या डोळ्याला असलेला चष्मा तेथेच खाली पडला.
   पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोनि पिंगळे, सोळंके, दत्तात्रय जपे, अनिल आढाव, गोमसाळे, आदी पोलीस आमच्या मदतीस पोहोचले.तेव्हा पोलिसांच्या गाड्या पाहून टेम्पो चालक व त्याच्यासोबतचे इसम तसेच विष्णू काळे याने फोन करून बोलावले लोक तेथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन तिथून पळून गेले. आम्हाला मदतीसाठी पोहोचलेल्या अधिकारी व स्टाफने विष्णू धोंडीबा काळे यास ताब्यात घेऊन  पोलीस स्टेशन येथे आणले. ठाणे अंमलदार यांनी मला औषध उपचार देऊन वैद्यकीय तपासणी होण्यासाठी सिविल हॉस्पिटल अहमदनगर येथे पाठविले. तेथे जाऊन आवश्यक औषधोपचार घेऊन फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आलो असून मला मारहाण शिवीगाळ व दमदाटी करून आमचे सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच विष्णू काळे यांनी माझ्या गालात चापटीने मारहाण मारहाण केल्यामुळे माझ्या डोळ्याला लावलेला चष्मा तुटून माझे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून विष्णू धोंडीबा काळे रा. सावेडी गावठाण सावेडी यांचे विरोधात कारवाई करावी.

No comments:

Post a Comment