सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसी हद्दीमध्येच व्हावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसी हद्दीमध्येच व्हावे

 सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसी हद्दीमध्येच व्हावे

कामगार संघटना महासंघ व कामगार हॉस्पिटल कृती समितीची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कामगार संघटना महासंघ आणि कामगार हॉस्पिटल कृती समितीच्या वतीने नुकतीच एमआयडीसी कार्यालयाचे क्षेत्र व्यावस्थापक श्री. लोंढे ए.एम. यांची भेट घेण्यात आली. यावेळी संघटीत असंघटीत कामगार, उद्योजक आणि परिसरातील जनता यांच्यावतीने त्यांना मागणीपत्र देण्यात आले.
   या मागणीपत्रात म्हटले आहे की, एमआयडीसीमधे हजारो संघटीत, असंघटीत कामगार बांधव कार्यरत आहेत. त्याप्रमाणे शेकडो कार्यालयीन कर्मचारी आणि उद्योजक आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी एमआयडीसी हद्दीमधे जागा उपलब्ध असतानाही अद्यापपावेतो अत्यंत महत्वाची गरज असुनही सरकारी हॉस्पिटल झालेले नाही. हि खेदाची बाब आहे. यासारख्या अ‍ॅमेनिटीसाठी उपलब्ध असलेल्या राखीव व खुल्या जागा काही भुखंड तस्कारांनी संगनमताने खोटीनाटी कागदपत्रे करून बळकावल्या आहेत काय ? हा प्रश्न आहे. हे प्रकरण राज्यभर गाजले आहे. याविषयी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात खटले दाखल होते.
   कामगार हॉस्पिटल कृती समिती आणि कामगार संघटना महासंघ मिळुन गेल्या चार/पाच वर्षांपासुन विविध पातळीवर याविषयी संघर्ष करत आहेत. सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसी हद्दीमधेच व्हावे जेणेकरून येथील कामगार, कर्मचारी व उद्योजकांना अपघातानंतर त्वरीत उपचार मिळेल. सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसीहद्दीमधेच व्हावे यासाठी आपल्या कार्यालयाने सहकार्य करावे. हॉस्पिटलसाठी उपलब्ध असलेल्या सांभाव्य जागा कुठे कुठे आहेत त्यावर आपण सामुहिक स्थळभेट देऊन पाहणी करून तसा सरकार दरबारी सकारात्मक अहवाल द्यावेत.
   यावेळी एमआयडीसी कार्यालयाचे श्री.टेकाळे उपस्थित होते. या शिष्टमंडळात कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, सेक्रेटरी भैरवनाथ वाकळे, सहसेक्रेटरी रामदास वागस्कर तसेच कामगार हॉस्पिटल कृती समिती अध्यक्ष दिपकराव शिरसाठ, सेक्रेटरी महादेव पालवे, सहसेक्रेटरी अरूण थिटे तसेच क्रांतिसिंह कामगार संघटनेचे बाळासाहेब सागडे, प्रशांत चांदगुडे, महादेव भोसले, आसाराम भगत, नानासाहेब खरात, वैभव कदम आदी उपस्थित होते.
   अहमदनगर एमआयडीसीमधे सरकारी कामगार हॉस्पिटल त्वरीत सुरू करावे यासाठी कामगार संघटना महासंघ व कृती समिती येत्या काळात मोठे आंदोलन करणार आहे.

No comments:

Post a Comment