जुगार अड्ड्यावर छापा 69,240 रुपयांच्या मुद्देमालासह 3 आरोपी ताब्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

जुगार अड्ड्यावर छापा 69,240 रुपयांच्या मुद्देमालासह 3 आरोपी ताब्यात.

 जुगार अड्ड्यावर छापा 69,240 रुपयांच्या मुद्देमालासह 3 आरोपी ताब्यात.

श्रीरामपूर ः हरेगाव उंदिरगाव रस्त्यावरील एका टपरीच्या आडोशाला तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी या ठिकाणी कार्यवाहीचे आदेश दिले. सदा कार्यवाहीत तीन आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला असून चार आरोपी फरार आहेत. या ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता सचिन लक्ष्मण गायकवाड वय 39 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर ,दीपक मेघन भोसले वय 45 रा.डी. क्वार्टर ता श्रीरामपूर , मयूर सर्जेराव पगारे वय 24 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर यांचेसह 69,240  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य चार आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 31/21 मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, डीवाय.एस.पी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल भोईटे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment