’एम्स’चे संचालक गुलेरिया यांचा इशारा महाराष्ट्रातील कोरोनाचा
नवा स्ट्रेन जास्त घातक.नवी दिल्ली ः महाराष्ट्रात करोना पुन्हा एकदा थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचा वेगही वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. दरम्यान, या संकटाबरोबर चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. देशात 240 नवीन करोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या करोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे. महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या करोना स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. इतकंच काय तर ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो, इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.Post Top Ad
Responsive Ads Here
Tuesday, February 23, 2021

’एम्स’चे संचालक गुलेरिया यांचा इशारा महाराष्ट्रातील कोरोनाचा
Tags
# Ahmednagar
# Breaking
# Maharashtra
Share This

About नगरी दवंडी
Maharashtra
लेबल्स
Ahmednagar,
Breaking,
Maharashtra
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment