भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांना धम्मभूषण पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांना धम्मभूषण पुरस्कार

 भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांना धम्मभूषण पुरस्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःदि.11/02/2021 रोजी ऐतिहासिक अहमदनगर शहरातील पंचशील विद्या मंदिर,सिद्धार्थ नगर येथे विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 11 फेब्रुवारी 1936 साली सोमवंशी हरिजन बोर्डिंग,पंचशील विद्या मंदिर,सिद्धार्थ नगर येथे भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय बौध्द महासभा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी एकता धम्म परिषद घेण्यात येते व धम्मकार्य,समाजकार्य करणार्‍यांना विशेष धम्मभूषण पुरस्कार देण्यात येतो.
यावर्षीही दुसरी एकता धम्म परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.प्रतिक बारसे यांच्या धम्मकार्य,समाजकार्य ची दखल घेऊन यांना सन्मानचिन्ह देऊन धम्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड,सचिव राजेंद्र साळवे, संदीप ठोंबे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव योगेश साठे,सचिव बाळासाहेब कांबळे, फिरोज पठाण, मनोज कर्डिले, भाऊ साळवे, मारुती पाटोळे, संदीप वाघमारे, अमर निरभवणे, दादासाहेब जावळे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment