सिमेंट स्टीलचे भाव रोखा ! नियंत्रण प्राधिकरण स्थापन करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

सिमेंट स्टीलचे भाव रोखा ! नियंत्रण प्राधिकरण स्थापन करा.

 सिमेंट स्टीलचे भाव रोखा ! नियंत्रण प्राधिकरण स्थापन करा.

बिल्डर्स असोसिएशन, आर्किटेक्ट, डेव्ह असो. क्रेडाई संघटनेची मागणी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सिमेंट, स्टील उत्पादक कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण देशात सिमेंट व स्टीलच्या किंमतीमध्ये अनैसर्गिक भाववाढ कंपन्या करत आहेत. त्यामुळे घरांच्या व बांधकाम प्रकल्पांच्या किंमती वाढत आहेत. या भाववाढीमुळे शासनाबरोबरच सर्वसामान्यांनाही याची झळ बसत आहे. केंद्र सरकारच्या ज्या पद्धतीने टेलिकॉम, विमा, बांधकाम आदि क्षेत्रांसाठी नियामक मंडळाची निर्मिती केली आहे. त्याच धर्तीवर सिमेंट व स्टीलचे भाव वाढ रोखण्यासाठी नियंत्रण प्राधिकरणाची नियुक्ती करावी, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, आर्किटेक्ट इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन व क्रेडाई संघटनेच्यावतीने सामुहिक पद्धतीने करण्यात आली आहे.
यावेळी बोलतांना जवाहर मुथा म्हणाले, कोरोना व लॉकडाऊनमुळे मरगळ आलेला बांधकाम व्यवसाय स्टील व सिमेंटच्या सातत्याने होणार्या दरवाढीमुळे आणखी अडचणीत आला आहे. सिमेंटची जवळपास 25 टक्के तर स्टील जवळपास 50 टक्के महाग झाले आहे. कंपन्यांच्या मोनोपॉली वृत्ती थांबली पाहिजे. परदेशामध्ये निर्यातीच्या नावाखाली तुटवडा दाखवून मनमानी पद्धतीने कंपन्या भाववाढ करत आहेत. या भाववाढीचा निषेध तीनही संघटनांच्यावतीने करत देशव्यापी आंदोलन छेडले आहे. त्वरित भाववाढ कमी झाली नाही तर संपूर्ण देशातील बांधकाम थांबविण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.  
मच्छिंद्र पागिरे म्हणाले, केंद्रीय बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी सिमेंट व स्टीलच्या कंपन्यांना भाववाढ थांबविण्याची तंबी दिली आहे. कंपन्यांचा मनमानी कारभार थांबण्यास तयार नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सलिम शेख म्हणाले, सिमेंट व स्टील भाववाढ तातडीने नियंत्रणात येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शेतीनंतर जास्तीत जास्त रोजगार देणारे देशातील हा एकमेव उद्योग आहे. लाखो कुटूंबीय या व्यवसायावर अवलंबून आहेत.यावेळी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी, मनपा उपायुक्त  श्री.पवार, लघु पाटबंधारेचे अधिक्षक ए.आर.नाईक आदिंना निवेदने देण्यात आली. यावेळी क्रेडाईचे संस्थापक चेअरमन जवाहर मुथा, बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन मच्छिंद्र पागिरे, इंजिनिअर आर्किटेक्ट असोसिएशनचे चेअरमन सलिम शेख, सचिव अन्वर शेख, खजिनदार प्रदीप तांदळे, माजी अध्यक्ष महेश गुंदेचा, मिलिंद वायकर, शरद मेहेर, विजय तवले, यश शाह आदिंसह तीनही संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिमेंट व स्टीलच्या भाववाढी नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, आर्किटेक्ट इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन व क्रेडाई संघटनेच्यावतीने आज देशव्यापी संप पुकारुन धरणे आंदोलन करण्यात आले. नगरमध्ये औरंगाबाद रोडवरील बांधकाम चालू असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसमोर तीनही संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी धरणे आंदोलन केले.

No comments:

Post a Comment