बाजार समितीचे गेट खुले व्हावे ! कृषी समिती सभापतीची मागणी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

बाजार समितीचे गेट खुले व्हावे ! कृषी समिती सभापतीची मागणी..

 बाजार समितीचे गेट खुले व्हावे !

कृषी समिती सभापतीची मागणी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बाजार समितीमध्ये ये जा करण्यार्‍या गाड्या आणि शेतकरी यांची संख्या मोठी आहे.वाहतूक नियंत्रण शाखेने गेटला कुलूप लावल्याने एकाच गेट वर ताण येऊन चौकात वाहतूक कोंडी वाढत आहे.गेट खुले व्हावे यासाठी जिल्हाधिकारी आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे.गेट खुले व्हावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केली आहे.
कै दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वाराचे एक गेट 10 ऑक्टोबर 2018 पासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून  एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते.त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते.पण त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे.शिवसेनेचे गेट उघडण्याचे आंदोलन औट घटकेचेच ठरले आहे.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीस अडथळा कारण दाखवत बाजार समितीच्या बाहेर पडण्याचा गेटला कुलूप लावलेले आहे.परिणाम बाजार समितीत येण्यासाठी आणि बाजार समितीतून बाहेर जाण्यासाठी सर्व वाहतुकदारांना एकाच मार्गाचा वापर करावा लागत आहे.त्यामुळे त्या चौकात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक कोंडीच जास्त होताना दिसत आहे.या बाजार समितीचे दोन्ही गेट खुले असावेत यासाठी बाजार समितीने ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही गेट खुले करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली होती पण प्रशासनाने त्यास दाद दिली नाही.मागील महिन्यात शहर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि इतर शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने त्या गेटचे कुलूप तोडत ते गेट खुले गेले पण त्यानंतर आठवडाभरातच वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment