कोर्टात खोटी साक्ष; गुन्हा दाखल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

कोर्टात खोटी साक्ष; गुन्हा दाखल!

 कोर्टात खोटी साक्ष; गुन्हा दाखल!

न्यायदेवतेचा अपमान हा गंभीर गुन्हा- न्या. सोनल पाटील
कोर्टात देवाची शपथ घेवुन खोटी साक्ष देणे हा न्यायदेवतेचा अवमान असुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. तर विश्वासघात/विश्वासभंग म्हणजे व्यक्तीस भावनिक/मानसिकरित्या ठार मारणे. एखाद्याला जीवानीशी ठार केल्यास  शरीराबरोबरच त्याच्या भावनाही मृत होतात. मात्र विश्वासघात/विश्वासभंग प्रकरणात पिडित व्यक्तीला आयुष्यभर त्याच भावनांबरोबर जगावे लागत असल्याने मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, त्यामुळे अश्या प्रकारे न्यायालयाबरोबरच सर्वसामान्यांचाविश्वासघात/विश्वास भंग  करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली तरच गुन्हेगारांना आळा बसेल.
- सोनल पाटील, न्यायाधीश

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः “देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही” अशी शपथ घेऊन खोटे बोलणार्‍या लिलाबाई काटे यांना चांगलेच महागात पडले आहे. लिलाबाई खोट बोलत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायमूर्ती सोनल पाटील यांनी काटे यांच्याविरोधात न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 195 (ल) (1) रेड विश कलम 191 व 193 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
लिलाबाई काटे यांनी आपण मयत व्यक्तीची पत्नी असल्याबाबतचा खोटा पुरावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोनल पाटिल यांच्यासमोर कोर्टात सादर करत खोटी साक्ष दिल्याचे निष्पण्ण झाले आहे. या प्रकरणातील सत्यता समोर येताच न्यायाधीश सोनल पाटील यांनी अश्या प्रकारे खोटी साक्ष व पुरावे सादर करणार्‍या गुन्हेगारांना चाप बसावा यासाठी याप्रकरणी दोषी असणार्‍या लिलाबाई काटे हिच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषी अढलणार्‍या आरोपीस सात वर्षापर्यंत कारावासाच्या शिक्षा होवु शकते.

No comments:

Post a Comment