महिला तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

महिला तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

 सहा हजारांची लाच घेताना पकडले रंगेहात

महिला तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे  नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्राच्या आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता 6 हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी स्वाती गौतम मेश्राम, (वय  37 वर्ष, धंदा - नौकरी,    तलाठी, सजा केलवड,वर्ग 3,  ता. राहता, जि. अहमदनगर.  रा.  स्वामी रेसीडेन्सी, बस स्टॅण्ड पाठीमागे, राहाता, ता. राहाता, जि. अहमदनगर)विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे  नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता यातील आरोपी लोकसेविका यांनी तक्रारदार यांचे कडे  7000/- ची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनीं  दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपीने पंचासमक्ष  7000/- ची मागणी करुन तडजोडीअंती  6000/- लाचेची  मागणी केली. सदरची रक्कम 09/02/2021 रोजी आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष, केलवड तलाठी कार्यालय, ता. राहता येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
सदरची कारवाही मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यावेळी श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर, हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर, पो हवा तन्वीर शेख,  पो ना प्रशांत जाधव. पो ना.चौधरी, विजय गंगुल, पो शि रविंद्र निमसे, वैभव पांढरे,  चालक पो ह. हरुन शेख.

No comments:

Post a Comment