पाथर्डीत विदेशी दारूसाठा जप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 1, 2021

पाथर्डीत विदेशी दारूसाठा जप्त

पाथर्डीत विदेशी दारूसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात छापा मारून राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने चारचाकी वाहनासह 10 लाख 17 हजार 784 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सचिन विठ्ठल शेळके (वय 36 रा. वडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वडगाव (ता. पाथर्डी) शिवारात दि. 31 जानेवारीला गोवा राज्य निर्मिती व महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा म्याकडोल नंबर 1 व्हिस्की 180ाश्र क्षमतेचे 2,496 सीबा(52 बॉक्स), इंपेरियल ब्लू व्हिस्कीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 480 सीबा (10 बॉक्स), म्याकडोल 144 सीबा (3 बॉक्स) व बनावट देशी दारू भिंगरी संत्राच्या 180 क्षमतेच्या 432 सीबा (9 बॉक्स) जप्त करून आरोपी  सचिन शेळके याला ताब्यात घेतले. यावेळी अवैध प्रकारे वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहन (एमएच 16 एवाय 4910) ताब्यात घेण्यात आले. दरम्यान फरार झालेला साथीदार बाळासाहेब रामराव जायभाय (रा. पिंपळनेर ता. शिरूर कासार जि. बीड) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 1949 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अहमदनगर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील निरीक्षक अण्णासाहेब बनकर, घोरतळे, दिंडकर, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, महिपाल धोका, विजय सूर्यवंशी, दत्तात्रय ठोकळ, वैभव बारवकर, दिगंबर ठुबे, उत्तम काळे, अंकुश कांबळे, सचिन वामन, सचिन बिटके, शेळके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment