पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

हर बाधा, हर बंदिश को तोड..
अरे भारत, आत्मनिर्भर के पथपर दौड.


“अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है. तेरा कर्मक्षेत्र बड़ा है, पल-पल है अनमोल, अरे भारत उठ, आंखें खोल. उन्होंने कहा कि मैं सोच रहा था । पण मी ते 21 व्या शतकात काय लिहीन असा विचार करीत होतो - अवसर तेरे लिए खड़ा है, तू आत्मविश्वास से भरा पड़ा है, हर बाधा, हर बंदिश को तोड़, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड़.” मैथिली शरण गुप्ता यांची कविता सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षा सह विरोधकांना लक्ष केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांच्यासह काँग्रेसला कृषी क्षेत्रात सुधारणा हव्या आहेत. मात्र, अचानक यू-टर्न घेतल्याने मी हैराण आहे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना लगावला. कृषी सुधारणा शरद पवारांनाही हव्या आहेत. ते सत्तेत असताना त्यांनी तसं म्हटलं होतं. कृषी सुधारणाच्या पद्धतीमध्ये वादविवाद असू शकतो. पण सुधारणा झाल्या पाहिजेत, हे त्यांचं मत होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, शरद पवार यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनीही कृषी सुधारणांबाबत मत व्यक्त केलं आहे. शरद पवार यांनी अजूनही या सुधारणांना विरोध केला नाही. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं आणि सुधारणा करत राहू. कृषी क्षेत्रात सुधारणा हव्या आहेत असं बोलणारे आज विरोधी पक्ष यू टर्न घेत आहेत, कारण राजकारण मध्ये येत आहे, असा निशाणा पंतप्रधान मोदी यांनी साधला.
पंतप्रधान मोदींनी सभागृहात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं विधान वाचलं. ‘आमचा विचार असा आहे की मोठी बाजारपेठ आणण्यात अडथळे आहेत. आमचा प्रयत्न आहे की शेतकर्‍याला पिकाची विक्री करण्यास परवानगी द्यावी. मनमोहन सिंग यांनी जे म्हटलं ते मोदींनी करत आहेत, अभिमान बाळगा, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील भाषणात बोलताना म्हटलं की, शेतकरी बांधवांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, सरकार चर्चेला नेहमीच तयार आहे. कायद्यांबाबत चांगल्या सूचना आल्या तर नेहमीच सुधारणा केल्या जातात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींनी पावणेदोन तास भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं. केंद्राच्या नवीन शेतीविषयक कायदे व शेतकरी निषेधाच्या धर्तीवर राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवेदनाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, विरोधी पक्ष आज शेती सुधारणांवर यू-टर्न का घेत आहेत? पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले की, काही लोक नवीन कृषी कायद्यांबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले, कायद्याबाबत शेतकर्यांची प्रत्येक शंका दूर होईल. कोणीही एमएसपी रद्द करू शकत नाही. एमएसपी होती, एमएसपी आहे आणि एमएसपी राहणार.’ राष्ट्रपतींच्या भाषणात झालेल्या गोंधळावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ’जर सर्वांनी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले असते तर लोकशाहीची प्रतिष्ठा आणखी वाढली असती. पण राष्ट्रपतींच्या भाषणाची ताकद इतकी होती की न ऐकून ही त्यावर चर्चा झाली. भारताची लोकशाही कोणीही काढून घेऊ शकत नाही.
पीएम मोदी म्हणाले, संपूर्ण जग अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अशा प्रकारच्या आव्हानांमध्ये मानवजातीला अशा कठीण काळातून जावे लागेल असा विचार कदाचित कोणी केला नसेल. पण हा देश तरुण आहे, देश उत्साहाने भरला आहे. हा देश अनेक स्वप्नांसह दृढनिश्चयाने पूर्ण होण्याचा प्रयत्न करीत आहे, हा देश या संधी कधीही सोडू शकत नाही. आज भारत संधींचा देश आहे. बर्याच संधी आपल्या प्रतीक्षेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले की, संपूर्ण जग आव्हानांना सामोरे जात आहे. कोणी याबाबत विचार कदाचित केला नसेल. या दशकाच्या सुरूवातीस, आमच्या राष्ट्रपतींनी संयुक्त सभागृहात भाषण केले जे नवीन आत्मविश्वास निर्माण करणारं आहे. हे भाषण म्हणजे स्वावलंबी भारताचा मार्ग दर्शवतो आणि या दशकासाठी मार्ग प्रशस्त करतो. पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी आपण प्रवेश करत आहोत ही देखील आपल्या सर्वांसाठी ही एक संधी आहे. हा उत्सव काहीतरी करण्यासाठी आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी म्हणजे 2047 मध्ये आपण कोठे आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. आज जग आपल्याकडे पहात आहे असेही मोदी म्हणाले

No comments:

Post a Comment