हजारे, आ. लंके, पोपटराव पवारांच्या हस्ते सरपंचनामा दिनदर्शिकेचे प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

हजारे, आ. लंके, पोपटराव पवारांच्या हस्ते सरपंचनामा दिनदर्शिकेचे प्रकाशन

 हजारे, आ. लंके, पोपटराव पवारांच्या हस्ते सरपंचनामा दिनदर्शिकेचे प्रकाशन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातीलही बातम्या प्रसिध्द करणार्‍या सरपंचनामा न्युज पोर्टलच्या सरपंचनामा दिनदर्शिकेचेप्रकाशन नुकतेच जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे,लोकनेते आ.निलेश लंके,सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
   सरपंचनामा न्युज पोर्टलच्या सरपंचनामा दिनदर्शिकाप्रकाशनाचे हे तिसरे वर्ष असून आतापर्यंत सलग तीन वर्षे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.ग्रामविकासापासून सुरू झालेला आण्णांचा प्रवास देश विदेशातील सर्व नागरिकांना प्रेरणादायी ठरला आहे.ग्रामपंचायत देशातील सगळ्यात तळाशी असलेली शासकीय व्यवस्था आहे.लोकसहभागातून विकासकामांची जोड दिल्यावर ग्रामपंचायतीमार्फत खेड्यांचं चित्र कसं बदलता येतं याचं प्रत्यक्ष दर्शन राळेगण सिद्धी व सरपंच पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार या गावाला भेट दिल्यावर प्रकर्षाने लक्षात येतं.सरपंचनामा या पोर्टलच्या माध्यमातून खेडोपाड्यातील ग्रामविकासाची प्रेरणादायी कामे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत.सरपंचांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून ’सरपंचनामा न्युज’काम करीत आहे.सरपंचनामा दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी पुढील कार्यास आशिर्वाद दिले.गावपातळीवर बातमीदारीतून ग्रामविकासाला साथ देणार्‍या सरपंचनामा न्युज पोर्टलला व दरवर्षी निःशुल्क दिनदर्शिका वितरित करणार्‍या सरपंचनामा दिनदर्शिकेच्या पुढील वाटचालीस हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार व पारनेरचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी शुभेच्छा दिल्या.
  यावेळी सरपंचनामा न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक विवेक बच्चे,कार्यकारी संपादक बापूसाहेब सोनवणे,खेड तालुका विभागीय संपादक अर्जुन मेदनकर,खेड तालुका विभागीय संपादक किशोर गिलबिले,खेड तालुका विभागीय संपादक संतोष पारधी,पारनेर तालुका संपादक संतोष सोबले,वेदांत बच्चे,सुभाष कड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment