भंडारा जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

भंडारा जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी

 भंडारा जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी

महिला जनआधार संघटनेचे नेवासा तहसिलदारांना निवेदन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः भंडारा जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या भीषण आगीमध्ये निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू झाला, ही अत्यंत खेदाची बाब असुन संपूर्ण देशासह महाराष्ट्र या घटनेनं हादरला असुन,दवाखाने असुरक्षित असल्याची खंत नेवासा जनाधार सामाजिक संघटनेनं व्यक्त केली.
   या प्रकरणाबाबत सखोल चौकशी होऊन चिमुरड्यांना न्याय मिळावा,तसेच जिल्हाभरातील रूग्णालयांची दुरूस्ती करून जनतेच्या जीवीताची काळजी प्रशासनाने घ्यावी,  या मागणीसाठी आज जनाधार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री प्रकाश पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका अध्यक्ष श्री. अजित वांढेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच श्री.अजय शिंदे यांच्या विशेष सहकार्याने महिला पदाधिकारी यांनी तहसिलदारांना  निवेदन दिले.
   यावेळी तालुकाध्यक्ष सौ. कोमल मोरे, मंगल भाकरे, कावेरी  शिंदे,नंदा  उगले आदि.जनाधार सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित  होत्या.

No comments:

Post a Comment