प्रेयसीची गळा दाबून हत्या.. मृतदेह भिंतीत बांधकाम करून पुरून टाकला.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

प्रेयसीची गळा दाबून हत्या.. मृतदेह भिंतीत बांधकाम करून पुरून टाकला..

 पोलिसही चक्रावले; प्रियकर गजाआड.

प्रेयसीची गळा दाबून हत्या.. मृतदेह भिंतीत बांधकाम करून पुरून टाकला..
चार महिन्यांपासून मृतदेहासोबत वास्तव्य !


मुंबई ः
प्रेम.. या दोन शब्दांच्या जाळ्यात फसून प्रियकराबरोबर पळून जाणार्‍या युवतींना सावधान करू पाहणारी घटना पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे घडलीय..प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह भिंतीत बांधकाम करून पुरून टाकून तिच्याच मोबाईल वरून व्हाट्सअप वर चॅटिंग करून प्रियसी जिवंत असल्याचे दर्शविणारा आरोपीचे बिंग अखेर फुटलं. पोलिसही चक्रावले. हिंदी चित्रपटातील थ्रीलर घटना प्रमाणे घडणारी ही घटना घरातून पळून जाणार्‍या युवतींना धोक्याचा कंदील दाखविणारी ठरली आहे.
उमरोळीची अमिता मोहिते चार महिन्यांपूर्वी प्रियकराच्या प्रेमापोटी घर सोडून गेली होती, पण परत आली नाही. यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान मुलीचा प्रियकर तिचं सोशल मीडिया अकाउंट वापरत होता आणि व्हॉट्सअ‍ॅपवरुन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधत होता. मुलगी जिवंत असल्याचं तो भासवत होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना संशय आल्यानंतर त्यांनी बोईसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासादरम्यान आरोपीने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह भिंतीत पुरला असल्याचं उघड झालं. आरोपी चार महिन्यांपासून त्याच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो असंही समोर आलं आहे. ज्या भिंतीत मृतदेह पुरला ती भिंतही आरोपीनेच उभारली होती. या सर्व घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत.
   पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरोळी येथील हे प्रेमी युगूल पळून लग्न करण्याच्या इराद्याने घर सोडून वाणगाव येथील वृंदावन दर्शन इमारतीमध्ये रहायला आलं होतं. त्याच रात्री आरोपी प्रियकराने प्रेयसी अमिता मोहितेची गळा दाबून हत्या केली. गुन्हा लपविण्यासाठी त्याने तिचा मृतदेह भिंतीमध्ये बांधकाम करून पुरून टाकला. गेल्या चार महिन्यांपासून आरोपी प्रियकर दुसर्‍या ठिकाणी राहत होता. मृत मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment