वडगाव तनपुरा ग्रामपंचायतीत सत्तांतर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

वडगाव तनपुरा ग्रामपंचायतीत सत्तांतर

 वडगाव तनपुरा ग्रामपंचायतीत सत्तांतर


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या असणार्‍या वडगाव तनपुरे ग्रामपंचायत मध्ये सुभराव तनपुरे पाटील यांच्या गटाने व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले व युवकचे तालुकाअध्यक्ष सचिन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली  उभारलेल्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने विजयश्री खेचून आणला, या विजयात पॅनलचे प्रमुख अंकुशराव तनपुरे, गुलाबराव तनपुरे, बाळासाहेब पांडुळे यांच्या विचारधारेवर
   युवक नेते महेश तनपुरे व निलेश तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला. या विजयामध्ये सुमित तनपुरे, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग पवार, जयराज शेडगे, नितीन सरोदे, रामचंद्र तनपुरे, महादेव तनपुरे, अण्णासाहेब तनपुरे, यांचा मोलाचा वाटा आहे.  
   तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये विजयी पॅनल शिवाय स्वप्नील बाळासाहेब तनपुरे यांचा  पॅनल व.नवनाथ आप्पा तनपुरे सह संजीवन तनपुरे यांचा  पॅनल अशा तीन पॅनलमध्ये निवडणूक लढवली गेली यामध्ये सुभराव तनपुरे पाटील गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने नऊ पैकी आठ जागा जिंकूूून सत्ता परिवर्तन घडवून आणले. पॅनल च्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला, गुलालाची उधळण केली फटाके फोडले म्हसोबागेट या ठिकाणी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन घुले यांनी विजयी उमेदवारांचे सत्कार केले व शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment