कर्जत तालुक्यात जल्लोषात 54 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

कर्जत तालुक्यात जल्लोषात 54 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी संपन्न

 कर्जत तालुक्यात जल्लोषात 54 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी संपन्न



नगरी दवंडी/
प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत तालुक्यात 54 ग्राम पंचायती साठी झालेल्या निवडणुकीत संमिश्र निकाल पहावयास मिळतात मिळाला, पोलिसांनी अत्यंत शिस्तबध्द केलेल्या नियोजनामुळे शहरात कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही.
   कर्जत शहरात आज तहसील कार्यालयात झालेल्या या मतमोजणीत सकाळी दहा वाजले पासून सुरू झालेल्या मतमोजणीत विविध ठिकाणी अनपेक्षित निकाल पहावयास मिळाले, तालुक्यातील तिन्ही पक्षाच्या तालुकाध्यक्षानी आपल्या गावाच्या सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळविले, यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील याच्या टाकळी खंडे. मध्ये 9-0 ने बाजी मारली. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे यांच्या नेतूत्वाखाली बारडगाव सुद्रीक मध्ये 9-2 ने बाजी मारली. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्या खांडवी गावात प्रवीण तापकीर यांच्या नेतृत्वाखाली 6-5 ने आपली सत्ता काढावर राखली, तालुक्यात दुर्गाव येथे अशोक जायभाय यांनी आघाडी घेतली, तर चिलवडी येथे गेली 25 वर्षांपासून सत्ताधारी असलेले पाटील गटाला धक्का बसला, मिरजगाव येथे मोठी चुरस निर्माण झाली होती याठिकाणी सत्ताधारी सरपंच खेतमाळस यांच्या गटाने 7 जागा जिंकल्या तर डॉ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे यांच्या गटाचे 7 तर परमवीर पांडुळे यांच्या गटाच्या नवयुग पॅनलचे 3 सदस्य निवडून आले, त्यामुळे या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.
   चापडगावमध्ये 11 जागासाठी तीन पॅनल मध्ये झालेल्या लढतीत विद्यमान सत्ताधारी रणजित घनवट यांनी आपली सत्ता राखत 9 जागा पटकावल्या तर विरोधी गटाचे मार्केट कमिटीचे उपसभापती प्रकाश शिंदे यांच्या पॅनलला अवघ्या 2 जागा मिळाल्या.
   तालुक्यात सर्वत्र शांतता असताना पाटेगाव मध्ये झालेल्या वादाने सर्वाचे लक्ष वेधले होते या ठिकाणी  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे यांच्या गटाचे 6 सदस्य तर देवकर गटाचे तीन सदस्य निवडून आले. तरडगावमध्ये अण्णा देमुंडे यांच्या गटाचे 4 सदस्य तर शिवाजी केसकर यांच्या गटाचे 3 सदस्य निवडून आले.
   निमगावडाकू अंकुश भांडवलकर, गणेश शेंडकर, घनश्याम जाधव यांच्या गटाचे 8 तर  राजू भोसले गटाचे 1 सदस्य निवडून आले.
   वडगाव तनपुरामध्ये महेश तनपुरे व निलेश तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 9 पैकी 8 जागा मिळवत आपले वर्चस्व राखले,
   चिंचोली काळदाते ग्रामपंचायत मध्ये बापूसाहेब काळदाते, यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे 8 तर विरोधी गटाचे रघुआबा काळदाते यांच्या गटाचे अवघे एक सदस्य निवडून आले.
नांदगाव मध्ये प्रेस फोटोग्राफर अण्णा बागल यांनी बाजी मारली.
   कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी दुरंगी तिरंगी लढती पहावयास मिळाल्या 54 ग्राम पंचायती च्या मतमोजणीच्या वेळी पूर्वीपेक्षा वेगळी पद्धत अवलंबली गेली यामध्ये 14 टेबल ला 14 ग्राम पंचायतीच्या मोजणी सुरू असत यामुळे मिरजगाव सारख्या गावाची मोजणी शेवट पर्यंत सुरू होती. यामुळे प्रत्येक गावच्या ग्रामस्थाना बराच वेळ अडकून पडावे लागत होते. महसूल यंत्रणेने नवीन तहसील कार्यालयात मतमोजणीची व्यवस्था केली होती, तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शना खाली चांगली व्यवस्था लावण्यात आली होती, मात्र या पत्रकाराची मोठी अडचण करत त्यांना ऐकावं पिंजर्यात ठेवल्यासारखी व्यवस्था करण्यात आले आली होती, त्याच्या मनात पर्यत माहिती देण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे पत्रकारामध्ये नाराजी पहावयास मिळत होती. तर विजयी मिरवणुका ही काढण्यास बंदी असल्याने कोणीही मिरवणूका काढल्या नाही. उप विभागीय पोलीस अधिकारी अण्णा साहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः उभे राहत अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments:

Post a Comment