स्वच्छतेचे 100 दिवस अदभुत अनमोल व अविश्वसनिय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

स्वच्छतेचे 100 दिवस अदभुत अनमोल व अविश्वसनिय

 स्वच्छतेचे 100 दिवस  अदभुत अनमोल व अविश्वसनिय


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः आपल्या कर्जत शहरातील स्वच्छतेच्या कामासाठी तेथील सरकारी व्यवस्थेवर आवलंबून न राहता एक जबाबदार नागरिक या नात्याने विविध संघटनांनी स्वच्छतेला सुरवात करून ते नवीन आदर्श उभा करत आहे. आज खर्‍या अर्थाने या संघटना स्वच्छतेची मोहीम ही फक्त नावासाठी व राजकीय फायद्यासाठी नसून फक्त आणि फक्त आरोग्यासाठी करत आहे ही नव्या पिढीसाठी नक्कीच आशादायक बाब आहे, असे मत प्रियेश सरोदे यांनी व्यक्त केले.  
   आपल्या कर्जत शहरात स्वच्छतेबाबत मोठी जागरूकता करण्यात आली आहे, तसेच गाव पातळीवर अनेक उपक्रम एकत्रितपाने राबवले जात आहेत, ही स्तुत्य बाब म्हटली पाहिजे.    जेव्हा कर्जत नगरपंचायत ने स्वच्छ सर्वेक्षण ने अभियानात सहभाग नोंदवला तेव्हा खर्‍या अर्थाने शहराची स्वच्छते बाबत असणारी जबाबदारी वाढली आहे. पाणी नियोजन, ओला कचरा आणि सुका कचरा, वृक्ष लागवड या बाबी नागरिकांना नव्याने सांगण्याची गरज भासली नाही, व ती नागरिकांनी देखील वेळोवेळी काळजी घेतलेली दिसते.  शहरात गट - तट, पक्षभेद विसरून सर्व मंडळी एकत्रितपणे कामाला लागली तर शहराचे रुपडे अधिक पालटून जाईल.  महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे धन इथल्या लोकांनी आपलेसे केले आणि आचरणात आणले.  त्याचबरोबर स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली.
   बी पेरले की फळे लगेच येत नाहीत; त्याला काही कालावधी जावा लागतो. असेच काहीसे आपल्या कर्जत शहरात घडले आहे. महाराष्ट्रात स्वच्छतेची जाणीव व जबाबदारी जनमानसावर बिंबविण्यास तसेच नागरिकांना प्रोत्साहित करण्यास राज्य सरकार अग्रेसर आहे. स्वच्छतेची प्रक्रिया काही महत्वाच्या निर्णयातून सुरु होते व कर्जत शहर हे चांगल्या गोष्टींचे स्वागत नेहमीच करत आलेले आहे. कर्जत शहरातील काही संघटना स्वच्छतेचा आग्रह धरतात व तशी अंमलबजावणी करण्यास प्रशासनास विनंती करतात व प्रशासन नागरिकांच्या हितासाठी वेळोवेळी अशा विनंतींना मान देऊन त्याची अंमलबजावणी करतात, असे दिसून येते. ज्या प्रभागात अस्वच्छता आहे, तेथील स्थानिक पत्रकारांची जबाबदारी ही की, त्यांनी परिसरातील स्वच्छतेला बाधक ठरणार्‍या प्रवृत्ती, प्रशासनातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला पाहिजे. पत्रकारांनी ‘जागल्या’ ची भूमिका पार पाडली तर प्रत्येक ठिकाणी आदर्श विकासकामे नक्कीच दिसून येतील. थोडक्यात, समाजातील प्रत्येक घटकाने समाजाच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील. स्वच्छतेची वाट निकोप आरोग्याकडे जाते. समाज निरोगी असेल तर समाजाचे भवितव्य उज्वल असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी लक्षात घेऊन सजगपणे विचार करणे व ते कृतीत आणणे महत्वाचे आहे.
   आज स्वच्छ सर्वेक्षण मोहीम 2020 ला 100 दिवस पूर्ण होत आहेत या श्रमदान चळवळीच्या शताब्दी दिनी सर्व स्वच्छता करणार्‍या सामाजिक संघटनांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment