क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रम

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः सकाळी 11:30  संध्याकाळी 7.30वाजता आरोळे वस्ती येथील सभाग्रह आरोळे वस्ती करून कोल्हे वस्ती येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
   स्त्रीरोग तज्ञ डॉ. माया पोकळे  यांच्या मार्गदर्शनाखाली   महिला अंतरंग स्वच्छता जागृती उपक्रम  घेण्यात आला ,या कार्यक्रमात डॉ माया पोकळे यांनी महिलांच्या स्वछते बद्दल खूप छान  मार्गदर्शन केले व महिलांनीसुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शंका डॉक्टरांना विचारल्या व त्यांच्या शंकाचे डॉक्टरांनी निरसन केले.
   तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस महिलांना विशेष भेटवस्तू म्हणून हायजिन किट वाटप करण्यात आले .
सदर उपक्रम आ .रोहितदादा पवार व त्यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली   कार्यतत्पर रमेश(दादा) आजबे व अश्विनी ताई रमेश आजबे आणि इंदुबाई (काकू) आजबे यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी  सहभाग घेतला व या कार्यक्रमाचा उपयोग त्यांना मोठ्या प्रमाणात झाला अशी  प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली व रमेश दादा आजबे व अश्विनी ताई रमेश आजबे आणि इंदुबाई आजबे  यांचे आभार मानले या कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होते व रमेश दादा आजबे यांनी सुद्धा उपस्थिती लावली.

No comments:

Post a Comment