जामखेड येथे राज्यस्तरीय हाफ मॅराथॉन स्पर्धा ः बबन काशिद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

जामखेड येथे राज्यस्तरीय हाफ मॅराथॉन स्पर्धा ः बबन काशिद

 जामखेड येथे राज्यस्तरीय हाफ मॅराथॉन स्पर्धा ः बबन काशिद


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः आजची तरुण पिढी व्यसनाधीन न होता चांगले संस्कारक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यात मल्ल विद्या संस्कार कुस्ती फौडेशन च्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात भविष्यात आयोजित केले जाणार असल्याची माहिती उप महाराष्ट्र  केसरी पै बबन काका काशिद यांनी दिली असून याचाच एक भाग म्हणून दि 27 जानेवारी रोजी राज्यस्तरीय हॉफ मॅराथॉन स्पर्धा जामखेड येथे आयोजित केली आहे, अशी माहिती पै बबन काका काशिद यांनी दिली आहे.
   तालुक्यात कुस्तीचे आकर्षण निर्माण करण्याचे प्रयत्न कै विष्णू वस्ताद काशिद प्रतिष्ठाण यांचे मार्फत दरवर्षी पंचमीच्या काळात भव्य कुस्ती हगामा भरवून परराज्यातील मल्लांना येथे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील मल्लांना मोठी संधी मिळवून दिली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर तरुणांना क्रिकेट, कब्बडी, खोखो, कुस्ती आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कॉलेज जीवनात आर्मी, सैनभरती, पोलीस भरतीच्या परीक्षा बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
   याच पार्श्वभूमीवर दि 27 जानेवारी रोजी जामखेड शहरात राज्यस्थरीय हाफ मॅराथॉन पुरूष व महिला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरुषांची 15 किलो मिटरची तर महिलांची आठ किलो मिटरची मॅराथॉन स्पर्धा होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये पुरूष गटाला प्रथम 11 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये, तृतीय 5 हजार रुपये, चार 3 हजार रुपये, पाच 2000 रुपये, सहा 1000 रूपये सदर स्पर्धेत महिला गटात सहा पारीतोषके ठेवण्यात आली आहे. प्रथम रूपये 5000, द्वितीय 3000 तृतीय 2000 चार 1500 पाच 1000 सहा 750 रूपयासह प्रशस्तिपत्रक, ट्राफी व मेडल असे बक्षीस असणार आहे. सदर स्पर्धा दि 27 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता शेतकरी मार्केट खर्डा रोड येथून सुरू होऊन राजूरी येथे पोहचून परत शेतकरी मार्केट येथे संपेल. ही स्पर्धा निशुल्क असून नाव नोंदणी आवश्यक आहे. तरी मोठ्या संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मल्ल विद्या संस्कार कुस्ती फौडेशन तर्फे करण्यांत आले आहे.

No comments:

Post a Comment