गुंडेगाव ग्रामपंचायत परिवर्तनाच्या दिशेने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

गुंडेगाव ग्रामपंचायत परिवर्तनाच्या दिशेने

 गुंडेगाव ग्रामपंचायत परिवर्तनाच्या दिशेने


गुंडेगाव प्रतिनिधी:-
गुंडेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत माजी जिल्हा परिषद सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती पण बबनराव हराळ पाटील गटाला गावातील सुशिक्षित युवकांनी मोट बांधून पंधरा वर्षेनंतर परिवर्तनाच्या दिशेने रामेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या सहा जागा निवडून आल्या आसून सर्व आरक्षित सदस्य निवडणूक जिंकले आसून गुंडेगाव ग्रामपंचायत परिवर्तन नक्की होणार आहे आसे मत अनेक जनकारांनी व्यक्त केले आहे.

    नगर तालुक्यातील गुंडेगाव ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची बनली आसताना सत्ताधारी पक्षाला सहा जागा व बबनराव हराळ सह युवकांच्या पॅनला सहा जागा व एक अपक्ष उमेदवार किंगमेकर बनले आहे . निवडणूकीच्या रणधुमाळीत अनेकांनी मोट बांधली होती तर अनेक युवकांनी मागिल तीन वर्षेपासून सत्ता परिवर्तन करण्याचा निर्धार केला होता ऐनवेळी अनेकांची फोडाफोडी करण्यात आली होती तर सत्ताधारी गटाने नगर तालुका भाजपा चिटणीस आपल्या दावणीला बांधण्यात आला होता पण सत्ता राखण्यासाठी अयशस्वी झाल्यावर अनेक कार्यकर्ते, युवक  परिवर्तनाच्याबाजूने पळ काढण्याचा प्रयत्नातून आसून अनेक राजकीय घडामोडी  झाल्या नंतर  पंधरा वर्षे एक हाती सत्ता आसून सुध्दा लोकांनी नाकारलं आहे हे सत्ताधारी गटाने मान्य केले आहे व संरपच पदाचे आरक्षण जाहीर होताच सत्ता परिवर्तनाचे चित्र स्पष्ट होणारआहे.
    या परिवर्तनाचे शिलेदार विजयी उमेदवार यांनी  मा. आमदार शिवाजी शिर्के साहेब यांची भेट घेतली व गुंडेगाव ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहेत, पुढील काळात विकासाचा मुद्दा घेऊन गावचा विकास साधला जाईल आसे मत बबनराव हराळ पाटील यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here