गिरीश महाजन यांची शिष्टाई चौथ्यांदा निष्फळ... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

गिरीश महाजन यांची शिष्टाई चौथ्यांदा निष्फळ...

 गिरीश महाजन यांची शिष्टाई चौथ्यांदा निष्फळ...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या  उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काल केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली. त्या बैठकीचा वृतांत घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन आज (दि.28) सकाळी नऊ वाजता येथे दाखल झाले.  महाजन यांनी दिल्लीतील बैठकीतील निर्णयांची  हजारे यांना माहिती दिली.स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीड पट हमीभाव मिळावा, दूध , फळे, भाजीपाला यांनाही हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगप्रमाणे स्वायत्तता मिळावी या हजारे यांच्या मागण्यांसाठी ता.30 जानेवारी पासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
हजारे यांच्याशी  माजी मंत्री महाजन यांनी सुमारे एक तास चर्चा केली. त्यांनतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट  हमीभाव मिळावा ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसह अन्य मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी केंद्रीय कृषी राज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय  काल दिल्लीत कृषिमंत्री नरेंद्र तोमर व विरोधी पक्षनेते नेते फडणवीस , संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या बैठकित झाला आहे.  त्याचे प्रारूप आज ठरविण्यात येणार आहे. अण्णांच्या मागणीनुसार या समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असणार आहेत. समितीतील सरकारचे सदस्य कोण असतील व अशासकीय सदस्य कोण असतील  याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. उद्या (29) केंद्रीय कृषी राज्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लेखी पत्र घेऊन राळेगण सिद्धी येथे येण्याची हजारे यांची भेट घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे लेखी पत्र घेऊन येणार आहेत. 83 वर्षांचे वय पाहता अण्णांनी उपोषण करू नये, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची इचछा असल्याचे माजी मंत्री महाजन पत्रकारांशी बोलताना सांगितले.मात्र या सर्व चर्चेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे तीस तारखेच्या आंदोलन होणार असल्याचे  सूत्रांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment