फरारी असलेला आरोपी शरद गुलबाशा भोसले यास अटक…. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

फरारी असलेला आरोपी शरद गुलबाशा भोसले यास अटक….

 फरारी असलेला आरोपी शरद गुलबाशा भोसले यास अटक….

 


नगरी दवंडी

जामखेड तालुका प्रतिनिधी 


 ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये मतदान करण्यासाठी खांडवी गावातील फरार आरोपी-नामे शरद गुलबाशा भोसले रा.खांडवी ता.जामखेड हा मतदान करण्यासाठी येणार आहे.अशी खात्रीशीर बातमी श्री.संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक जामखेड यांना मिळाल्याने त्यांनी लगेच खांडवी बुथवर ड्युटी करणारे पोलीस अंमलदार पेाकॉ.रोहिदास गुंडाळे नेम-कोतवाली पोलीस स्टेशन  व होम.अरुण पोटे नेम.नगर तालुका होमगार्ड पथक तसेच खांडवी गावातील पोलीस पाटील श्री.संतोष बापुराव डिसले व डी.बी.पथकातील सपोनि.महेश जानकर,पोकॉ.संग्राम जाधव,पोकॉ.आबासाहेब आवारे,पोकॉ.संदिप राऊत,पोकॉ.अरूण पवार यांना सदर मिळालेल्या बातमीतील आरोपी शदर भोसले यास ताब्यात घेण्यासाठी कळवले होते. आरोपी नामे शरद गुलबाशा भोसले हा मतदान केंद्रात जावुन मतदान करून बाहेर आल्यानंतर त्याला काही समजायच्या आत त्याचेवर झडप घालुन जागीच पकडण्यात आले.नमुद आरोपी विरूद्ध जामखेड पोलीस स्टेशन ला गु.र.नं. 743/2020 भा.द.वि कलम 307,504,506 प्रमाणे गुन्हयात फरार होता.त्याचेवर याअगोदर जामखेड पोलीस स्टेशनला यापुर्वीही भादवि कलम -302,307 ,354 सारखे गंभिर गुन्हे दाखल असुन तो जामिनावर सुटलेला आहे.या गुन्हयात आरोपी पकडण्यासाठी पोलीस पाटील श्री.संतोष डिसले यांनी खास मदत केली असल्याने त्यांचे श्री.आण्णासाहेब जाधव डी.वाय.एस.पी. कर्जत विभाग कर्जत यांनी अभिनंदन केले आहे.पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांनी सांगितले की ,अशा प्रकारे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजुन पोलीसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment