महिला सक्षमीकरणासाठी टाटा पॉवर कटिबध्द -प्रवीण वाघ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

महिला सक्षमीकरणासाठी टाटा पॉवर कटिबध्द -प्रवीण वाघ

 महिला सक्षमीकरणासाठी टाटा पॉवर कटिबध्द -प्रवीण वाघ

तीन हजार महिलांना मिळणार विविध व्यावसायिक प्रशिक्षण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः टाटा पॉवरच्या वतीने केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात रोशनी प्रकल्प अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन खांडके-सुपा पवन ऊर्जा विभाग प्रमुख प्रवीण वाघ यांच्या हस्ते झाले.
या प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून बचत गटातील सुमारे तीन हजार महिलांना वेगवेगळ्या प्रकल्पातंर्गत शेतीपूरक उद्योग व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, रजई तयार करणे, शिवणकाम, विणकाम, लघु व मध्यम उद्योग व्यवसाय, ब्युटी पार्लर आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी प्रवीण वाघ म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी टाटा पॉवर कटिबध्द असून, त्या दृष्टीने समाजातील गोर-गरीब व गरजू महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य करीत आहे. महिलांना स्वयंरोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वास सोनावले यांनी सी.एस.आर अंतर्गत होत असलेल्या कामांची माहिती देऊन या प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी हा उपक्रम सुरु आहे. सहेली विश्व व अनोखा धागा यांच्या माध्यमातून महिला बचत गटासाठी प्रशिक्षण व ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणात तज्ञ व्यक्तींकडून महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादार जॉर्ज यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही. गुणवत्ता व नाविण्यपुर्ण बनवलेल्या वस्तूंना बाजारात चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबीरास ग्रामीण भागातील महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

No comments:

Post a Comment