अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणासाठी भाविकांकडून मदतीचा ओघ सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणासाठी भाविकांकडून मदतीचा ओघ सुरू

 अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणासाठी भाविकांकडून मदतीचा ओघ सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणासाठी भिंगार व परिसरात श्रद्धानिधी संकलनाचे काम सुरू झाले असून भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरासाठी निधी देत आहेत.
अयोध्येतील श्रीराम मंदिराची निर्मिती 57हजार 400चौरस फूट जागेवर होत आहे.लांबी 360फूट रुंदी 235फूट आणि उंची 161 स्तंभ त्यावरच्या मजल्यावर 132 स्तंभ आणि सर्वात वरती 74स्तंभ उभारण्यात येणार आहेत.शिवाय संग्रहालय ग्रंथालय 360डिग्री रंगभूमी यज्ञशाळा भाविकांना एकत्र येण्यासाठी मोठे दालन,सत्संग भवन,धर्मशाळा अभिलेखागार असे नियोजन आहे.
मंदिराच्या आवारात साधारण 67.3 एकर जागेवर अतिथी भवन संशोधन केंद्र, प्रशासकीय भवन, काही निवासस्थाने प्रदर्शनाची,भाविकांच्या सोयीसुविधा,वाहनतळ संगीतमय फवारे आदींची रचना करण्यात आली आहे.
जगातील प्रत्येकाची प्रभूश्रीरामावर श्रद्धा आहे. त्याला आपल्या कमाईतील फुलं ना फुलाची पाकळी अर्पण करता यावी यासाठी गावागावातून श्रद्धानिधी जमा करण्यात येत आहे.
निधी जमा करण्यास सुरुवात करण्याआधी गावातील  मंदिरांमधून विधीवत पूजन केले जात आहे.प्रत्येक गावात घराघरात जावून भाविकांकडून  श्रीराम भक्त श्रद्धानिधी जमा करीत असून भाविक त्यांना सहकार्य करीत आहे.

No comments:

Post a Comment