वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना मिळावी ! मनसे बॅनरबाजी करणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना मिळावी ! मनसे बॅनरबाजी करणार?

 वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना मिळावी ! मनसे बॅनरबाजी करणार?

खाजगी हॉस्पिटलच्या लुटमारीची माहिती शरद पवारांना देणार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रविवार दि. 24 जानेवारीला देशाचे सर्वोच्च नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख येत आहेत त्यांच्या हा खाजगी हॉस्पिटलचा वाढीव बिलांचा प्रश्न मनसे ते येणार त्या मार्गावर ”पवार साहेब गोरगरीब जनतेची कोरोना आजारवरिल वाढीव बिलांची रक्कम परत मिळवुन द्या”असे बॅनरलावणार आहे. पवार साहेबांमुळे गोरगरीब जनतेची वाढीव बिलांची रक्कम परत मिळेल अशी आशा आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहरध्यक्ष गजेद्र राशिनकर यांच्या सूचनेनुसार हे बॅनर लावण्यात येनार असल्याची माहिती मनसे जिल्हा सचिव भुतारे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने कोरोना काळातील जे खाजगी हॉस्पिटल मधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्याकरिता निवेदन देण्यात आली आंदोलन करण्यात आली, उपजिल्हाधीकरी यांच्या समितीने संपुर्ण बिलांचे ऑडीट करुन  आता पर्यंत 14 ते 15 खाजगी हॉस्पिटल कडुन जवलपास   एक करोड रुपये वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात आले व हे पैसे संबधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करावे असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी, आरोग्य अधिकारी यांनी या सर्व हॉस्पिटल ला दिले परंतु या सर्व हॉस्पिटल नी या उपजिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्या आदेशला केराची टोपली दाखवली. आजपर्यंत महानगरपालिकेने सुध्दा वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे  कुठल्याही प्रकारची कारवाई या संबधित  हॉस्पिटल वर केली नाही. कोरोना आजारात गोरगरीब जनतेला बेड सरकारी रुग्णालयात मिळत नव्हते म्हणुन ना इलाजासत्व खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले व त्यांना लाखो रुपयांचे बिले या खाजगी हॉस्पिटल वाल्यानी वसुल केले शासनाने दिलेल्या कुठल्याही नियमाप्रमाणे या हॉस्पिटल वाल्यांनी बिले दिली नसल्यामुळे गोरगरीब जनतेची लुटमार झाली. त्यामुळे आम्ही मनसेच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन पाठविले परंतु कुणीही या जनतेच्या प्रश्ना कडे लक्ष दिले नसल्याचा खेद भुतारे यांनी व्यक्त केला.
पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष्य मनोज राऊत महिला उपजिल्हा ध्यक्ष अ‍ॅड अनिता दिगे, रस्ते आस्थापन जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसेचे उपशहरअध्यक्ष, विभागअध्यक्ष व कार्यकर्ते नियोजन करनार आहेत.. व सर्व मनसेचे शिष्टमंडळ पवार साहेबांना भेटुन या संदर्भात निवेदन सुध्दा देणार आहेत. सदर बॅनर वर खाली दिलेल्या हॉस्पिटलची वाढीव बिलांची रक्कम मनसे बॅनरवर छापण्यात येणार आहे.

औरंगाबाद रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी रविवार दि. 24 जानेवारीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार अहमदनगर ला येत आहेत यात एका हॉस्पिटलने रुग्णांकडून ते 30 लाख 75 हजार 410 रुपयांची वाढीव बिले वसूल केली आहेत. शहरातील अशा 14 हॉस्पिटलांना कोट्यवधी रुपयांची वाढीव बिलांची मनपा प्रशासनाने आदेश देऊनही रुग्णांना परत दिली नाही. मनसेने या विरोधात अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिला होता. आता शरद पवारांच्या दौर्‍यादरम्यान पवारांच्या नियोजित मार्गावर हॉस्पिटलची यादी लावून शरद पवार यांना भेटून मनसे या वाढीव बिल वसुलीसाठी साकडे घालणार आहे.

No comments:

Post a Comment