“शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी” बाळासाहेबांनी ही ओळख निर्माण केली - सुरेखा कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

“शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी” बाळासाहेबांनी ही ओळख निर्माण केली - सुरेखा कदम

 “शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी” बाळासाहेबांनी ही ओळख निर्माण केली - सुरेखा कदम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत होते. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करुन मानाचे स्थान मिळवून दिले. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढून त्यांचे हक्क मिळवून दिले. कोणत्याही सत्तेची लालसा न बाळगता, गोर-गरीबांचे प्रश्न सोडवा हा त्यांचा आदेश होता. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकजण शिवसेनेशी जोडले गेले. सर्वसामान्यांची, सर्वसामान्यांसाठी अशी शिवसेनेची ओळख निर्माण करुन समाजात एक परिवर्तन घडून आणले. महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले. आज मराठी माणूस जो ताठमानेने जगतो, ही त्यांचीच देण आहे. आपण त्यांचे हे ऋण कधीही विसरु शकत नाही, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम  यांनी केले.
याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे समस्त हिंदू समाजाचे हिंदूहृदय सम्राट होते. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मराठी अस्मिता जागृत करुन मराठी माणसाला मानाचे स्थान मिळवून दिले. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. सर्वात जास्त काळ मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी शिवसैनिकाची मोठी फळी तयार करुन तळगाळातील लोकांना मानाचे स्थान मिळवून दिले,
हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे शिवसेनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, गणेश कवडे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, श्याम नळकांडे, संग्राम शेळके, मदन आढाव, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, अमोल येवले, संग्राम कोतकर, सुनिल लालबोंद्रेे, दत्ता जाधव, दिपक खैरे  बबन शिंदे, सुरेश तिवारी, प्रकाश फुलारी, संजय छजलानी, रवी लालबोंद्रे, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, अ‍ॅड. संतोष गायकवाड, सागर गायकवाड, प्रविण बेद्रे, विष्णू थोरात, सागर शहाणे, आकाश हुच्चे आदिंसह अनेक नागरिकांनीही यावेळी या थोर नेत्यास अभिवादन केले. याप्रसंगी दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर, संतोष गेनप्पा आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. माळीवाडा येथे सजावलेल्या स्टेजवर बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा लावून पूजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment