ई व्हेईकला चार्जिंग सेंटरचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

ई व्हेईकला चार्जिंग सेंटरचा शुभारंभ

 ई व्हेईकला चार्जिंग सेंटरचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः माझी वसुंधरा स्पर्धेत शहराचे वायु प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने ई व्हेईकला प्राधान्य द्यायचे असून यासाठी शहरात विविध ठिकाणी ई व्हेईकला चार्जिंग सेंटर कर्जत नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात  उपलब्ध करून दिले असून त्याचे उद्घाटन कर्जत तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍य्याच्या हस्ते करण्यात आले,  कर्जत शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 व माझी वसुंधरा या
स्पर्धासाठी सर्व सामाजिक  संघटना व आम्ही कर्जतचे सेवेकरी  या दोन्हीच्या  सदस्यांची यावेळी उपस्थीती होती.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी करताना या चार्जिंग पॉईटचे महत्व विशद केले व शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले,
पर्यावरणाचे वाढते प्रदूषण लक्षात घेता ई वेहिकल संकल्पना अनेक ठिकाणी अमलात आणली गेली मात्र त्यासाठी आवश्यक असणारे चार्जिंग सेंटर कर्जत शहरात उपलब्ध नव्हते याचा प्रश्नावर कर्जत नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी यांनी पुढाकार घेत कार्यालयाच्या आवारात चार्जिंग सेंटर उपलब्ध करीत त्याचे उद्घाटन तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी सर्व स्वच्छतादूत आणि श्रमप्रेमी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुन्ना पठाण, उपाध्यक्ष अशिष बोरा, निलेश दिवटे
गणेश जेवरे यांंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दर मंगळवारी नो व्हेइकल डे अमलात आणावा यासह शक्य असल्यास ई वेहिकल वापरण्याचा  प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थिताना माझी वसुंधरा शपथ देण्यात आली.  उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मच्छीन्द्र अनारसे, सुभाष माळवे, डॉ अफरोज पठाण, अस्लम पठाण, भाऊसाहेब रानमाळ, नितीन देशमुख, अभय बोरा, विशाल म्हेत्रे, काकासाहेब काकडे, राहुल नवले, राजू बागवान, वरद म्हेत्रे, महेश राऊत, विशाल तोरडमल, शेरखान पठाण, यांच्यासह अनेक स्वच्छताप्रेमी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बापू उकिरडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment