विश्व मानवाधिकार परिषद सेलच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. कांबळे यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

विश्व मानवाधिकार परिषद सेलच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. कांबळे यांची नियुक्ती

 विश्व मानवाधिकार परिषद सेलच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. कांबळे यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विश्व मानवाधिकार परिषदच्या एस.सी, एस.टी. (मागासवर्गीय) सेलच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अ‍ॅड. निलेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.आर. अन्सारी यांनी अ‍ॅड. कांबळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. विश्व मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवेद शेख यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शोएब खान, शोएब जहागीरदार, सय्यद शफीबाबा, अज्जू शेख, अल्ताफ शेख, चंद्रकांत उजागरे आदी विश्व मानवाधिकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने नागरिकांच्या न्याय, हक्कासाठी कार्य सुरु आहे. सामाजिक कार्याची दखल घेत युवकांना संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. एस.सी,एस.टी (मागासवर्गीय) समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द आहे. मागासवर्गीय दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यातच जीवनाचे खरे समाधान असून, या संघटनेच्या माध्यमातून युवकांचे चालू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक करुन नुतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment